जयपूर - राजस्थानमधील कोटा शहाराला 'कोचिंग क्लास सिटी' म्हटले जाते. या शहरामध्ये विविध परीक्षांची तयारी करण्यास आलेले हजारो विद्यार्थी अडकून पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना आता बसमधून घरी सोडण्यात येत आहे. आज (बुधवारी) कर्नाटक आणि पश्चिम बंगालला विद्यार्थ्यांना घेऊन बस रवाना झाल्या.
कर्नाटकसाठी कोटा शहरातून ७ बस निघाल्या आहेत. विविध क्लासेसमध्ये शिकणाऱ्या १६२ विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले, की आम्हाला खूप दूर जायचे होते. त्यासाठी परवानगीही मिळत नव्हती. आमचे पैसे रूमच्या भाड्यावर खर्च होत होते. अशा परिस्थितीत कर्नाटक आणि राजस्थान सरकारने आमची मदत केली, त्यामुळे दोन्ही सरकारांचे आम्ही आभार मानतो.
पश्चिम बंगालला १०१ बस रवाना
कोटा शहरातून १०१ बस विद्यार्थ्यांना घेऊन पश्चिम बंगालला निघाल्या आहेत. यामध्ये २ हजार ८००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यानुसार बसची सोय करण्यात आली आहे.