सुरत (गुजरात) - सुरतमधल्या पालिगाम भागातील सचिन इंड्स्ट्री परिसरात एक स्थानिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेथील संपूर्ण भाग पोलिसांनी सील केला होता. मात्र, त्यानंतर नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य न करता त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली. काही काळानंतर वातावरण तापले आणि लोकांनी पोलिसांवरच दगडफेक केली होती. याप्रकरणात 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपआयुक्त विधी चौधरी यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पालिगाम भागातील सचिन इंड्स्ट्री परिसरात स्थानिक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर तो भाग प्रशासनाने सील केला. मात्र, नागरिकांनी गोधळ सुरू केला आणि पोलिसांना शिवीगाळ करत दगडफेक केली. यात एकही पोलीस जखमी झाला नाही मात्र, हा प्रकार धक्कादायक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. सध्या येथील परिस्थिती आटोक्यात आली असल्याचेही त्या म्हणाल्या.