सेंट फ्रान्सिस्को - चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्हने दिलेल्या 140 हून अधिक वैज्ञानिकांनी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या माहिती आणि त्यांच्या हिंसाचाराचा प्रसार करण्याऱ्या द्वेषपूर्ण पोस्ट्सवर अंकुश ठेवण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आणि इतर नोबेल पुरस्कार विजेते असलेल्या गणमान्य, वैज्ञानिकांचा आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. अशाप्रकारचे त्यांचे हे विधान चुकीचे असल्याचे वैज्ञानिकांनी पत्रात लिहिले आहे.
हा मुद्दा आफ्रिकी-अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर उठलेल्या जोरदार विरोधावरुन ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन उठला. फेसबुकच्या अनेक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करुन ट्रम्पच्या वादात्मक पोस्टला अंकुश लावण्याची मागणी केली होती. ट्रम्प यांनी लुटपाट सुरू तर गोळीबारही सुरू अशाप्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट केले होते. अशाप्रकारे केलेल्या पोस्टवर ज्या प्रकारे ट्विटर यांनी कठोरपणे पाऊल उचलले आहे. मात्र, फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टवर अशाप्रकारची कुठलीही कारवाई किंवा पाऊल न उचलल्याबाबत आक्षेप घेतला. फेसबुकच्या अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत ऑनलाईन पोस्ट करून झुकेरबर्ग यांची निंदा केली.
याबाबत फेसबुकच्या सीझेडआयच्या एका प्रवक्ताने स्पष्टीकरण दिले. मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिस्किल्ला चान यांनी सन २०१५ मध्ये चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह या परोपकारी संस्थेची स्थापन केली आहे. याच्या प्रवक्ताने आपल्या स्पष्टीतकरणात 'आम्ही आमचे कर्मचारी, भागीदार आणि अनुदान देणाऱ्याचे आभारी आहोत आणि आम्ही फेसबुकच्या धोरणांसह त्यांच्या मतांचा आवाज उठवण्याच्या त्यांच्या अधिकाराचा आदर करतो', असे ते म्हणाले. तसेच, ट्रम्प यांना चुकीची माहिती आणि आक्षेपार्ह वक्तव्यांसाठी फेसबुकचा वापर करू देण्याची परवानगी यामुळे फेसबुकच्या धोरणांचे उल्लंघन तर होतेच सोबतच सीझेडआयच्या ध्येयाचाही थेट विरोध होते, असे ते म्हणाले आहेत.
तर, दुसरीकडे मार्क झुकेरबर्ग यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भडकाऊ पोस्टच्या बचावाबाबत कर्मचार्यांमधील वाढती अशांतता दूर करण्याचा शनिवारी प्रयत्न केला. याबाबत स्पष्टीकरण देताना, झुकेरबर्ग म्हणाले, की ते कंपनीच्या नितीमुल्यांची समीक्षा करतील आणि गरज पडल्यास त्यात बदलही करतील. त्यांनी याबाबर विस्तारपूर्वक माहिती दिलेली नाही आहे. मात्र, फेसबुकवरील कंटेटच्या बाबतीत त्यांचा दृष्टीकोन अधिक पारदर्शी राहील याबाबत आश्वासन दिले आहे.