श्रीनगर (जम्मू काश्मिर) - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या कारवायांमध्ये बुधवारी पाच जणांसह चौदा दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांची विशिष्ट माहिती मिळाल्यामुळे सकाळी शोपियानच्या सुगू हेंधामा भागात सैन्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी लपून बसलेल्या अतिरेक्यांनी सैन्य दलाच्या शोध पथकावर गोळीबार केल्यावर शोध पथकानेही पलटवार करत त्याला उत्तर दिले. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाचही अतिरेक्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे काश्मिर विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. या यशस्वी कारवाईसाठी त्यांनी सैन्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
ते म्हणाले की, रविवार (7 June जून) पासून स्थानिकांच्या लोकांच्या मदतीने शोधून त्यांना कंठस्नान घालणयात आले आहे. या कारवाईमध्ये आपली कमीतकमी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाई दरम्यान जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या चार दिवसातील शोपियानमधील ही तिसरी सशस्त्र कारवाई होती. 7 आणि 8 जूनला सैन्याबरोबर झालेल्या दोन कारवायांमध्ये कमांडरसह नऊ हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी ठार झाले.
शोपीयानमध्ये झालेल्या कारवाया-
7 जून : रेबन गावात पाच अतिरेकी ठार झाले
8 जून: पिंजोरा गावात चार अतिरेकी ठार झाले
10 जून: सुगू हेंधामा गावात पाच अतिरेकी ठार