जयपूर - राजस्थानमध्ये बुधवारी कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १०६वर पोहोचली आहे. हे सर्व रुग्ण जयपूरच्या रामगंजमध्ये आढळून आले आहेत. जयपूरमध्ये आता राज्यातील सर्वाधिक (३४) रुग्ण आहेत. यामधील २६ रुग्ण हे रामगंजमध्ये आहेत.
२६ मार्चला रामगंज भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. हा व्यक्ती सौदी अरेबियाहून परतला होता. त्यानंतर या भागातील रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज आढळलेले सर्व रुग्णही रामगंजमधील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली.
या भागातील पहिला कोरोनाग्रस्त १२ मार्चला दिल्ली विमानतळावर उतरला होता, त्यानंतर त्याच दिवशी बसने तो घरी आला होता. २६ मार्चपर्यंत त्याने बऱ्याच व्यक्तींची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कुटुंबीयांपैकी दहा जणांना आणि एका मित्रालाही कोरोना झाल्याचे याआधीच निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : कोरोनावर उपचार करताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटींची मदत!