चंदीगढ - अमेरिकेत शिक्षण घेण्याचे आणि नोकरी करण्याचे अनेक भारतीयांचे स्वप्न असते. काहीही करून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. मात्र, एजन्टला लाखो रुपये देऊन परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची फसवणूकही होते. आज अमेरिकेने १२३ भारतीयांना अवैधरित्या प्रवेश केल्याचे म्हणत हद्दपार केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर हद्दपार केलेल्या भारतीयांचे विमान उतरले.
ट्रॅव्हल एजन्टच्या फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन हद्दपार करण्यात आलेल्या युवकांनी केले आहे. आपल्या पालकांचे पैसे वाया घालवल्याची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न सोडून भारतातच शिक्षण घेण्याचा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.
'एका एजन्टने मला १० वर्षांचा व्हिसा आणि अमेरिकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे सर्व खोटे होते. मला नोकरीही मिळाली नाही, आणि व्हिसाही मिळाला नाही. अशा खोटारड्या एजन्टविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे एका भारतीयाने सांगितले.