इंदोर - युनायटेड अरब आमिरात येथे कोरोना व्हायरसमुळे 114 भारतीय अडकून पडले होते. त्यांना 'वंदे भारत' योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या विमानाने रविवारी संध्याकाळी इंदोर विमानतळावर आणण्यात आले आहे.
हे विमान रविवारी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी 8.15 वाजता उतरले. यातील 64 प्रवाशांना इंदोरमध्ये थांबवण्यात आले आहे. तर उरलेल्या प्रवाशांना मुंबईला पाठविण्यात आल्याची माहिती विमानतळाचे संचालक आर्यमा सन्याल यांनी दिली.
इंदोरमध्ये थांबवण्यात आलेल्या 64 प्रवाशांना स्क्रीनिगमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून आले आहे. यातील 12 प्रवासी इंदोरचे आहेत. ज्यांच्याकडे लक्षणे नसल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे, त्यांना 14 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार असल्याची माहिती इंदोर जिल्ह्याचे नोडल ऑफीसर अमित माळकर यांनी सांगितले.