ETV Bharat / bharat

औरंगाबाद दुर्घटना : शाहडोलमधील गावावर पोहोचली शोककळा..

जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला.

Aurangabad Accident Shahdo
औरंगाबाद दुर्घटना : शाहडोलमधील गावावर पोहोचली शोककळा..
author img

By

Published : May 8, 2020, 8:34 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशात असणाऱ्या शहडोल जिल्ह्यातील एका गावावर शोककळा पसरली आहे. कारण, या एकाच गावातील ११ कामगार आज सकाळी महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत पावले होते. रेल्वे रुळांवर झोपलेल्या या कामगारांना भरधाव मालगाडीने चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद दुर्घटना : शाहडोलमधील गावावर पोहोचली शोककळा..

या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाने तातडीने या लोकांची माहिती घेण्यास सुरूवात केली होती. दुपारपर्यंत यामधील ११ लोकांची ओळख पटवण्यात यश आले, आणि हे सर्व एकाच गावात राहत असल्याची माहिती समोर आली. जनपद तालुक्यातील जयसिंहनगरजवळच्या अंतौली आणि बैरिहा टोला या गावांतील हे सर्व रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आमदारही या गावाकडे रवाना झाले. तिथे पोहचून त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे आणि जवळपास सर्व गावकऱ्यांचे सांत्वन केले.

जिल्हाधिकारी सत्येंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतौली गावातील ९, तर शेजारीच असलेल्या बैरिहा टोला गावातील दोघांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असल्याचेही सिंह यांनी सांगितले. तसेच, तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच, सर्व मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच, आज सायंकाळी औरंगाबादहून रेल्वेने त्या कामगारांचे पार्थिव जबलपूरला आणले जातील, आणि तेथून उद्या सकाळी त्यांचे पार्थिव गावामध्ये आणून कुटुंबीयांना सोपवण्यात येतील, अशी माहिती सिंह यांनी दिली.

हेही वाचा : लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.