रांची - झारखंडमधील घाटशिला येथे ११ विदेशी धर्मगुरुंची तरुंगात रवानगी करण्यात आली आहे. बुंडू येथील एका धार्मिक स्थळावरून त्यांना अटक करण्यात आली होती. सर्व धर्मगुरू कझाकिस्तान आणि तुर्कीचे नागरिक असून त्यांच्यावर व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अटक केलेले सर्वजण टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले होते. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते भारतात राहून धर्माचा प्रसार करत होते. तसेच लॉकडाऊनच्या काळात सरायकेला-खरसावां या परिसरातील कपाली येथे तबलीगींच्या आदेशावरून मोठी सभा देखील आयोजित केली होती. याच काळात कपालीमधून बुंडूला गेले. त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या आधी त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी स्वतः ही माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केल्यानंतर त्यांनी जवळपास २५ दिवस जमशेदपूर येथील मुसाबनीमधील कॉन्स्टेबल ट्रेनिंग सेंटरमध्ये क्वारंनटाईन केले होते. त्यांच्यामध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळले नसल्याने आता त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ७ एप्रिलला त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.