दिल्ली - भारतातील जवळपास १.५ कोटी पेक्षा जास्त अॅन्ड्रॉइड फोनमध्ये 'मालवेयर' नामक वायरस असल्याचे एका कंपनीने केलेल्या रिसर्च मधून म्हटले गेले आहे. ईस्राराइलच्या एका सायबर सिक्योरिटी रिसर्च कंपनीने सांगितल्यानुसार या वायरसच्या माध्यमातून अॅन्ड्रॉइड फोनमधील व्हॉट्सअॅप सारखे महत्वाचे अॅप्लीकेशन्स हॅक होऊन त्या ठिकाणी त्याचे डुप्लीकेट वर्जन अॉटोमॅटीकली इन्स्टॉल होते. यानंतर युजर्सच्या फोनमध्ये विविध खोट्या जाहिराती दाखविल्या जातात. या कंपनीने सांगितल्यानुसार ह्या वायरसने भारतासारख्या विकसनशील देशातील अॅन्ड्रॉइड युजर्सना सर्वात जास्त टार्गेट केले आहे. इतकेच नव्हे तर या वायरसच्या माध्यमातून अॅन्ड्रॉइड फोनला हॅक करून त्यातील युजर्सची खासगी माहिती, बँकेचे ऑनलाईन व्यवहार इत्यादी माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार भारतातील जवळपास १.५ कोटी अॅन्ड्रॉइड फोनवरती या घातक वायरसने हल्ला केला आहे, तर अमेरिकेमधील ३ लाख आणि इंग्लंडमधील १,३७,००० अॅन्ड्रॉइड फोन या मालवेयर वायरसच्या आहारी गेले.
हा वायरस अॅन्ड्रॉइड फोनमध्ये थर्ड पार्टी अॅप ९apps.com च्या माध्यमातून पसरविला जात आहे. हे अॅप्लीकेशन चीनच्या अलीबाबा ग्रुपचे आहे. तसेच गूगलच्या अधिकारीक प्ले स्टोरच्या माध्यमातून अॅप्लीकेशन्स डाउनलोड केल्यास या मालवेयरचे फोनमधे येण्याचे प्रमाण नाहीच्या बरोबर असेल.
'मालवेयर' म्हणजे नक्की काय?
तर ही मालवेयर नावाची भानगड म्हणजेच एक प्रकारचे सॉफ्टवेअर असून ते एखाद्या वायरसारखंच काम करते. हा वायरस इंटरनेटच्या माध्यमातून युजर्सच्या कंप्युटर, लॅपटॉप, मोबाइल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना हॅक करतो आणि वापरकर्त्याच्या परवानगीविनाच त्यातील संबंधित डेटा अपलोड आणि डाउनलोड करतो. इतकेच नव्हे तर या वायरसच्या माध्यमातून युजर्सची खासगी माहितीदेखील चोरी केली जाऊ शकते.
या माध्यमातून तुमच्या फोनमधील ईमेल, पत्ते, फोन नंबर, संदेश, फोटो, व्हिडिओ यासारख्या कित्येक महत्वाच्या माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका असतो. जगभरातील हॅकर्सही इंटरनेट हॅकिंगमध्ये मालवेअरचा वापर करतात.
त्यामूळे मोबाइल सर्फिंग करताना, काही डाउनलोड करायच्या आधी ते विश्वासात्मक सोर्सधूनच डाउनलोड करा, अन्यथा आपल्या फोनमधील महत्वपूर्ण माहिती ही केव्हा चोरी जाईल याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही.