ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचे ध्येय राजकारणाच्या पलिकडे आहे -जयराम रमेश - भारत जोडो यात्रा ही पक्षासह देशात एकता वाढवणारी

भारत जोडो यात्रेचा उद्देश मतपेढीशी जोडलेला नाही. आमचे ध्येय राजकारणाच्या वर आहे असे मत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे. ते मंगळवार (दि. 15 नोव्हेंबर)रोजी वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. हा राजकीय पक्षाचा प्रवास आहे. त्यामध्ये राजकीय विषयांचा समावेश आहे. मात्र, हे सर्व मतांसाठी केले जात नाही असही ते यावेळी म्हणाले आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश
author img

By

Published : Nov 15, 2022, 3:37 PM IST

वाशिम - भारत जोडो यात्रा ही पक्षासह देशात एकता वाढवणारी आहे. त्यामुळे पक्षाची अन् देशाची पुन्हा एकजूट झाली आहे. जर त्याचा काही परिणाम झाला तर तो 2024 मध्ये दिसून येईल. तसेच, "ही यात्रा घरोघरी संपर्क वाढवणारी आहे, जो संपर्क आम्ही सत्तेत असताना विसरलो होतो असा जाहीर खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.

यात्रेने पक्षात एकजूट कुठून आणली? - गेल्या 70 दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेने राजकीय आव्हानांचा सामना करत असताना पक्षात एकता आणली आहे. मंगळवारी यात्रेने ६९व्या दिवसात प्रवेश केला. हिंगोली येथून सुरू होऊन महाराष्ट्रातील विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी आहेत.

यात्रेचा व्होट बँकेशी संबंध नाही - भारत जोडो यात्रेचा कोणत्याही व्होट बँकेशी संबंध नाही, असेही जयराम रमेश म्हणाले आहेत. त्याचा हेतू राजकारणापलीकडचा आहे. या यात्रेमुळे एकता वाढेल, यामुळे आमच्या पक्षाला एकजूट झाली आहे. त्याचा परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसून येईल. 18 नोव्हेंबर रोजी यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे राहुल गांधी या रॅलीचे प्रमुख आकर्शन आहेत.

प्रियंका चतुर्वेदीनेही या यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली - एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते आधीच सहभागी होत आहेत. नांदेडमधील रॅलीत राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले होते. तर, शिवसेनेचे आदित्य ठाकरे स्वत: यात्रेत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या आणखी एका नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही यात्रेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले. भारत जोडी यात्रा ही जादूची कांडी नाही. आम्हाला प्रत्येक राज्यात तळागाळात काम करायचे आहे. निवडणुकीचा अजेंडा राज्यातील नेते, आमदार आणि खासदार यांच्या हातात आहे, फक्त राहुलवर अवलंबून राहू नका. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात झाली. पुढच्या वर्षी ती काश्मीरमध्ये संपेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.