ETV Bharat / bharat

Bhagavad Gita Compulsory : भगवद्गीता सर्व शाळांमध्ये सक्तीची करावी - सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी

author img

By

Published : Dec 4, 2022, 8:22 PM IST

समाजातील परिस्थिती आणि घडामोडींचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, समाज सध्या विभागला आहे. भाषा, सीमा, पाणी, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये आपल्याला सर्वत्र फरक दिसतो. आपल्यात एकता वाढवायची असेल तर त्यासाठी भगवद्गीतेची आवश्यकता आहे, (Bhagavad Gita should made compulsory in school) असे मत त्यांनी व्यक्त केले. (Speaker Vishweshwar Hegade Kageri).

Etv Bharat
Etv Bharat

दावणगिरी (कर्नाटक) : शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता अनिवार्य असावी या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. (Bhagavad Gita should made compulsory in school). "शालेय शिक्षणात भगवद्गीता असायलाच हवी, व ती सर्व शाळांमध्ये सक्तीचे करावी", असे त्यांनी म्हटले आहे. (Speaker Vishweshwar Hegade Kageri).

म्हणून भगवद्गीतेची आवश्यकता : दावणगिरी शहरातील राष्ट्रोत्थान विद्या केंद्रात आयोजित श्रीभगवद्गीता अभियान कर्नाटक-2 राज्यस्तरीय महा संर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशी चर्चा सध्या चालू आहे. भगवद्गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करून ती मुलांना सक्तीने शिकवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपवर आरोप आहे की ते अभ्यासक्रमाचे भगवेकरण करत आहेत. त्यामुळेच ते शालेय शिक्षणात भगवद्गीता समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. समाजातील परिस्थिती आणि घडामोडींचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, समाज सध्या विभागला आहे. भाषा, सीमा, पाणी, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये आपल्याला सर्वत्र फरक दिसतो. आपल्यात एकता वाढवायची असेल तर त्यासाठी भगवद्गीतेची आवश्यकता आहे, असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.