कोलकाता - पश्चिम बंगाल भाजपा नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची कोरोना संदर्भातील टीका राजकीय असल्याचा आरोप केला आहे. यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे भ्रमात राहिले होते. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना करण्याऐवजी आपण केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी लक्ष केंद्रीत केले, यामुळे 'स्किजोफ्रेनिया'(मानसिक विकार) सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. स्किजोफ्रेनिया एक गंभीर मानसिक रोग आहे. अशा प्रकारचा आजार जडलेला रुग्ण वास्तविक आणि काल्पनिक दुनियेत फरक समजू शकत नाही, अशी टीका सेन यांनी केली होती.
अमर्त्य सेन यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले की, सेन अशा प्रकारे जगभरात भारत सरकारची निंदा करू शकत नाहीत. मात्र, मी इतकाही अंहकारी नाही, की सेन यांचे आता वय झाले आहे आणि आता त्यांना समुदेशनाची गरज आहे, असे सांगेन. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी सेन यांनी केलेल्या वक्तव्यांना विसरता कामा नये. सेन यांनी केंद्र सरकार आणि मोदी विरोधात केलेले वक्तव्य पूर्णत: राजकीय असल्याचीही टीका भट्टाचार्य यांनी केली.
अर्थतज्ज्ञ सेन यांनी शुक्रवार रात्री राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात सरकार भ्रमात असल्यामुळेच कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हातळता आली नाही. सरकारने जे केले ते त्याचे श्रेय घेण्यासाठी गुंतून राहिले. मात्र, त्यांना हे निश्चित करायला हवे होते की, भारतात ही महामारी पसरणार नाही.