ETV Bharat / bharat

Mobile Battery Exploded : खेळताना मुलाच्या हातात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; दोन बोटे तुटली!

मुलाच्या हातातील मोबाईलची बॅटरी फुटल्याने सागर जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. घरात खेळत असताना (Battery Exploded in Sagar) बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे मुलाच्या हाताची दोन बोटे वेगळी झाली.

author img

By

Published : May 3, 2022, 6:06 PM IST

Mobile Battery Exploded
मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट

भोपाळ- कडक उन्हामुळे मोबाईलची बॅटरी फुटण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील रहाटगढ येथे घडली आहे. घरात खेळत असताना 9 वर्षांच्या मुलाच्या हातात मोबाईलची बॅटरी फुटली. बॅटरीमध्ये एवढा जोरदार स्फोट झाला की मुलाच्या हाताची दोन बोटे तुटून वेगळी झाली आहेत. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक घटनास्थळी (Battery Exploded in Sagar on child hand) पोहोचले. त्यांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले.

हाताच्या पंज्यापासून बोटे वेगळी - शहरातील प्रभाग पाचमध्ये राहणारा शहजाद हा मोबाईलच्या बॅटरीशी खेळत होता. त्यानंतर अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट इतका मोठा होता की शहजादच्या उजव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या हाताची दोन बोटे पंजापासून वेगळी झाली. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या वेळी त्याचे वडील कामासाठी घराबाहेर गेले होते.

जखमी मुलावर उपचार सुरू - घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी तात्काळ शहजादला रहाटगड आरोग्य केंद्रात नेले. येथून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बुंदेलखंड वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले ( Battery Exploded in Sagar two finger separated )आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी शहजादचे काका झहीर यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी शहजाद एकटाच होता. तो बॅटरीशी खेळत होता. त्यानंतर अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या घटनेत शहजादच्या हाताच्या बोटांसोबतच शरीराच्या इतर भागातही जखमा झाल्या आहेत.

हेही वाचा-Chardham Yatra 2022 : दोन वर्षानंतर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ; यमुनोत्रीचे उघडले दरवाजे

हेही वाचा-Loco pilots went to drink alcohol : बिहारमध्ये लोको पायलटने दारू पिण्याकरिता थांबविली तासभर रेल्वे, पोलिसांकडून अटकेची कारवाई

हेही वाचा-जोधपूर हिंसाचार : जोधपूरमध्ये तणावाची स्थिती; झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.