चंदीगड - भगवंत मान सरकारच्या काळात पंजाबमध्ये ( Punjab Farmer loan Recovery ) कर्जबाजारी शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कृषी विकास बँकांचे कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार अटक वॉरंट ( Punjab Farmer Arrest Warrants ) जारी करण्यात आले आहेत. राज्यभरात सुमारे दोन हजार शेतकऱ्यांविरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मान सरकारने 71 शेतकऱ्यांकडून 3200 कोटी रुपये वसूल करणार आहेत. सरकारच्या कारवाईविरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी उसळली आहे.
फिरोजपूरमध्ये शेतकऱ्यांवर कारवाई - कर्ज वसुलीसाठी सरकारकडून फिरोजपूरमध्ये शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी फार्म डेव्हलपमेंट बँकने बस्ती रामवाडा येथील शेतकरी बक्षीश सिंग यांना अटक केली आहे. तसचे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी एका महिन्यात बँकेचे कर्ज फेडणार असल्याचे लेखी सांगितल्यानंतरही शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
बँक अधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे? - केवळ सरकारने कर्जमाफी केल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करत नाहीत. शेतकरी कर्ज फेडण्यास तयार आहेत, परंतु त्यांना कर्जावरील व्याज देण्यास नकार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करणे ही बँकेची जबाबदारी असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांवर वॉरंट बजावले? - फिरोजपूर जिल्ह्यातील सुमारे 500 शेतकऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यापैकी काही नवीन तर अनेक जुने वॉरंटचे नव्याने जारी करण्यात आले आहे. पंजाबमध्ये 60,000 शेतकऱ्यांना डिफॉल्टर घोषित करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांवर 2300 कोटींची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांकडून 1150 कोटी रुपयांच्या वसुलीची माहिती तयार करण्यात येत आहे. गेल्या हंगामात बँकेला केवळ 200 कोटींची वसुली करता आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोजपूरमध्ये सुमारे 250, जलालाबादमध्ये 400, फाजिल्कामध्ये 200 आणि मानसामध्ये 200 शेतकऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा - Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; मातोश्रीवरील सुरक्षेत वाढ