नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये बँकांना 21 दिवस सुट्टी आहेत. बँकांना सलग आठ दिवस सुट्टी असणार आहेत. मात्र, या सुट्टी एकाच राज्यातील बँकांना नाहीत. जाणून घ्या, महाराष्टारातील बँकांना ऑक्टोबरमध्ये किती दिवस सुट्टी असणार आहेत.
आरबीआयच्या वेळापत्रकानुसार जाहीर होणाऱ्या सुट्टी विविध राज्यांना वेगवेगळ्या असतात. तर काही सुट्टी देशातील सर्व बँकांना लागू होतात. या वेळापत्रकानुसार ऑक्टोरबर 2021 मध्ये बँकांना शनिवारी व रविवारी वगळता केवळ दोन सुट्टी आहेत. तर शनिवार व रविवारीच्या एकूण सहा सुट्टी असणार आहेत.
हेही वाचा-अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी
महाराष्ट्रातील बँकांना या दिवशी सुट्टी
- 2 ऑक्टोबर 2021 - महात्मा गांधी जयंती (संपूर्ण देशभरात)
- 15 ऑक्टोबर 2021- दुर्गा पूजा, दसरा, विजया दशमीनिमित्त संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे. केवळ मणीपूर, हिमाचल प्रदेशमधील बँकांचा अपवाद असणार आहे.
आठवडाखेर या असणार सुट्टी-
- 3 ऑक्टोबर 2021 - रविवारी
- 9 ऑक्टोबर 2021 – दुसरा शनिवार
- 10 ऑक्टोबर 2021 –रविवार
- 17 ऑक्टोबर 2021 –रविवार
- 23 ऑक्टोबर 2021 – चौथा शनिवार
- 24 ऑक्टोबर 2021 – रविवार
हेही वाचा-भर मंदिरात मुख्यपुजाऱ्याची गोळी मारून हत्या; मारहाणीत आरोपीचा मृत्यू
असे करा बँकांच्या कामांचे नियोजन
- बँकांचे तुम्ही पैसे काढणे किंवा जमा करणे असे आर्थिक व्यवहार तुम्ही नेटबँकिंग द्वारे पूर्ण करू शकता.
- जर रोकड रकमेची आवश्यकता असले तर पुरेशी रक्कम आधीच काढून घेऊ शकता. जेणेकरून बँकांच्या सुट्टी असताना एटीएममध्ये पर्याप्त पैसे नसताना होणारी धावपळ टळू शकते.
- जर तुम्हाला बँकांच्या सुट्टी कालावधीमध्ये रोख पैसे खात्यावर भरायचे असेल, तर काही एटीएमवर तशी सुविधा असते.
हेही वाचा- ठाकरे पॅटर्न विसरून शिवसेनेची गांधी पॅटर्नकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस
संपूर्ण देशभरात बँकांच्या सुट्टीचे हे आहे वेळापत्रक-
* 1 ऑक्टोबर -अर्धवार्षिक बँक खाते बंद केल्याने गंगटोकमध्ये कामावर परिणाम होईल.
2 ऑक्टोबर-गांधी जयंतीनिमित्त अगरतळा ते तिरुअनंतपुरम पर्यंत बँका बंद राहतील.
* 6 ऑक्टोबर - आगरतळा, बंगळुरू, कोलकाता येथे महालय अमावस्येमुळे बँका बंद.
* 7 ऑक्टोबर -इम्फाळमध्ये बँका उघडणार नाहीत.
* 12 ऑक्टोबर - महा सप्तमीमुळे बँका बंद राहतील.
* 13 ऑक्टोबर - महाअष्टमीमुळे आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा, रांची येथे बँक कामगारांची सुटी.
* 14 ऑक्टोबर - अगरतळा,बंगळुरू,चेन्नई,गंगटोक,गुवाहाटी,कानपूर,कोलकाता,रांची,लखनौ,पाटणा,रांची, शिलाँग,तिरुअनंतपुरम येथे महानवमीमुळे बँका बंद.
* 15 ऑक्टोबर- दसऱ्याच्या निमित्ताने अगरतळा,अहमदाबाद ते तिरुअनंतपुरम येथे बँका बंद.
* 16 ऑक्टोबर - गंगटोकमध्ये बँक दुर्गा पूजेला सुटी.
* 18 ऑक्टोबर - गुवाहाटीमध्ये काटी बिहूची सुटी.
* 19 ऑक्टोबर-अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, देहरादून, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे ईद-ए-मिलादमुळे सुटी
* 20 ऑक्टोबर - अगरतळा, बंगळुरू,चंदीगड,कोलकाता, शिमला येथे वाल्मिकी जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
* 22 ऑक्टोबर - जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुटी असेल.
* 26 ऑक्टोबर -परिग्रहण दिनामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका उघडणार नाहीत.