कानपूर : बेकनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील तलक महलजवळ शुक्रवारी एका जीर्ण इमारतीची बाल्कनी कोसळली. (balcony of old building fall in Kanpur). ढिगाऱ्याखाली दबून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बाल्कनी कोसळताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच बेकनगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी संपूर्ण इमारत रिकामी करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. (old building fall in Kanpur Uttar Pradesh).
इमारत 80 वर्षे जुनी : बेकनगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यांनी सांगितले की, तालक महलजवळ ट्रस्टची इमारत 80 वर्षांहून अधिक जुनी आहे. या इमारतीत 8 भाडेकरू राहतात. यासह तळमजल्यावर अनेक दुकाने आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरा इमारतीचा पुढील भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली दबल्याने दुकानदारासह 6 जण जखमी झाले. आरडाओरडा ऐकून आलेल्या लोकांनी सर्वांना बाहेर काढले. यानंतर सर्वांवर जवळच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बॅरिकेड्स लावून संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. इमारत रिकामी केल्यानंतर इमारतीत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.