बोलांगीर (ओडिशा) - मोबाईलसाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीची पतीने दोन दिवसांपासून आपला मोबाईल वापस दिला नाही म्हणून पतीचे ओठ कापल्याची घटनासमोर आली होती. आता ओडिशामध्ये मोबाईलसाठी लग्नाच्या तीन महिन्यातच स्वत:च्या पत्नीला विकल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी बेलपारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीवरून अल्पवयीन पतीला अटक करण्यात आली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून झाले प्रेम -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलपारा ठाण्याच्या परिक्षेत्रातील सुलेकेला गावात राहणाऱ्या सरोज राणा याला संतला परिसरातील बोलांगीर जिल्ह्यातील रेवती (नाव बदलले) नावाच्या एका मुलीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम झाले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांशी बोलून त्यांनी त्यांच्या सहमतीने लग्नही केले होते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आर्थिक तंगीमुळे रेवतीला घेऊन सरोज हा रायपूरला वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेला. तेथून ते राजस्थानमधील एका गावात गेले.
आईवडीलांना दिली खोटी माहिती -
कामानिमित्त पत्नीला राजस्थानमध्ये घेऊन गेलेल्या सरोजने तेथे एका व्यक्तीला रेवतीला विकले आणि तिच्या आईवडीलांना फोनकरून ती दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेल्याचे सांगितले.
पोलिसांनी पतीला केली अटक -
सरोज याच्या बोलण्यावर संशय निर्माण झाल्याने रेवतीच्या आईवडीलांनी थेट जवळील बेलपारा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्राराची दखल घेऊन पोलिसांनी रेवतीचा शोध घ्यायला सुरूवात केली. त्यांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने रेवतीचा शोध घेतला आणि तिची सुटका केली. तसेच, पोलिसांनी याप्रकरणी सरोज याला अटक केली आहे.
हेही वाचा - खळबळजनक : पत्नीचा मोबईल घेणे पडले महागात; पत्नीने कापले पतीचे ओठ