मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपी वकिल सुधा भारव्दाज यांना 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. पुण्यातील न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू होता मात्र त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रिय तपास संस्थेने मुंबई विशेष सत्र न्यायालयात हलवले या ठिकाणी सुधा भारद्वाज यांनी जामीनासाठी अर्ज केला होता, न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी पुन्हा अर्ज केला त्यावर एक डिसेंबर रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
सुधा भारद्वाज ह्यांची 50 हजार रुपयाच्या कॅश सिक्युरिटी आणि अन्य अटीसह जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सुधा भारद्वाज या व्यावसायिक वकील असून त्या छत्तीसगड मध्ये प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणीची याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांना महिन्यात एकदा NIA कोर्टात हजर राहण्यासाठी बंधनकारक करावे अशी मागणी कोर्टाकडे केली आहे. सुधा यांना कोर्टाच्या परवानगी शिवाय बाहेर जाता येणार नाही. नातेवाईकांचे राहत्या घराच्या पत्त्यासह माहिती देण्यात यावी. आपली राहती जागा बदलताना कोर्टाला कळवणे गरजेचे आहे. प्रसार माध्यमात या केस संदर्भात कोणताही प्रकारचे वक्तव्य करू नये.गरज असल्यास कोर्टाच्या सुनावणी साठी हजर होण्याचे आदेश सुधा यांनी देण्यात आले आहे.
Bail To Sudha Bharavdaj To be Released From Taloja Jail Today : सुधा भारव्दाज यांना जामीन, आज तलोजा जेलमधून होणार सुटका - मुंबई उच्च न्यायालय
कोरेगाव भीमा दंगल प्रकरण (Koregaon Bhima riot case) व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या वकिल सुधा भारव्दाज (Lawyer Sudha Bharavdaj) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 1 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरुद्ध NIA ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली. त्यामुळे भारव्दाज यांची 50 हजार रुपयाच्या कॅश सेक्युरिटी आणि अन्य अटीसह जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.