ETV Bharat / bharat

Bageshwar Dham Baba Got Y Security : बागेश्वर धाम बाबांना वाय श्रेणीची सुरक्षा बहाल, 8 जवान राहणार तैनात; मध्यप्रदेश सरकारचा आदेश जारी - पंडित धीरेंद्र शास्त्री

बागेश्वर धाम बाबा यांना केंद्र सरकारने वाय श्रेणीची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे. त्यामुळे बागेश्वर धाम बाबांच्या प्रतिष्ठेत आता चांगलीच वाढ झाली आहे.

Bageshwar Dham Sarkar
बागेश्वर धाम बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री
author img

By

Published : May 25, 2023, 1:47 PM IST

भोपाळ : बागेश्वर धाम बाबा पंडित धीरेंद्र शास्त्री यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा बाहल करण्यात आली आहे. त्यांना सुरक्षा देण्याची मागणी बिहार राज्यात सुरू झाल्यापासूनच जोर धरू लागली होती. बिहारचे माजी डीजी (नागरी संरक्षण) आयपीएस अरविंद पांडे यांनी ही मागणी जोरदारपणे मांडली. यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांना वाय Y+ श्रेणीची सुरक्षा मिळाल्याचे अनेक पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र प्रत्यक्षात बुधवारी केंद्र सरकारने त्यांना वाय श्रेणी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ते देशातील कोणत्याही राज्यात गेल्यास त्यांना वाय श्रेणीत सुरक्षा दिली जाणार आहे. हे परिपत्रक भोपाळच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलीस महानिरीक्षकांनी जारी केले आहे.

Bageshwar Dham Baba Got Y Security
परिपत्रक

काय आहे आदेश : पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला आहे. पंडित धीरेंद्र गर्ग कृष्ण शास्त्री, बागेश्वर धाम बाबा यांना सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व राज्यांना पाठवलेल्या परिपत्रकात पंडित धीरेंद्र शास्त्री यांना त्यांच्या राज्यांच्या तरतुदीनुसार वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यास या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कशी असते वाय श्रेणीची सुरक्षा : वाय श्रेणीच्या सुरक्षेत 1 किंवा 2 कमांडो आणि पोलीस कर्मचार्‍यांसह 8 जवानांचे सुरक्षा कवच प्रदान केले जाते. यामध्ये दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (पीएसओ) देखील सुरक्षा म्हणून दिले जातात. भारतात या श्रेणीची सुरक्षा मिळवणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. पोलिसांसोबतच अनेक एजन्सी, व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींना हे सुरक्षा कवच असते. यामध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG, NSG, ITBP आणि CRPF यांचा समावेश आहे. विशेष लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त NSG च्या खांद्यावर असली तरी झेड प्लस सुरक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे CISF कडेही ही जबाबदारी सोपवली जात आहे.

हेही वाचा -

  1. PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
  2. Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए अधिकारी नागपुरात दाखल
  3. Satyendr Jain Admitted To DDU : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.