हरिद्वार ( उत्तराखंड ) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावर योगगुरू बाबा रामदेव यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बाबा रामदेव म्हणाले की, काही लोकांची अशी भावना असते की, ते भारतात अन्न खातात, मात्र इतर देशांची गाणी जगभर गातात. राजकारण्यांनी असे काम करू नये. ज्यांना भारतात राहून जनतेची मते घेऊन नेते व्हायचे आहे, ते असे कसे करतात? असे बाबा रामदेव म्हणाले आहेत.
गंगेच्या काठावर फुलांची होळी साजरी : योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे दक्षिण काली मंदिरात नीलधारा गंगेच्या काठावर मोठ्या थाटामाटात होळीचा सण साजरा केला. बाबा रामदेव यांनी संन्यासी आणि त्यांच्या साथीदारांसोबत गंगेच्या काठावर फुलांची होळी खेळली. यावेळी फुलांसह गंगाजलाने होळी खेळण्यात आली. यासोबतच गंगास्नानही करण्यात आले. होळी साजरी करण्यासाठी गंगेच्या काठावर पोहोचलेल्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी प्रतिज्ञाही घेतली आहे. त्याचवेळी बाबा रामदेव यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर : बाबा रामदेव यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी युकेमध्ये जाऊन भारताबाबत आभेपार्ह वक्तव्य केले, त्यावर टीका केली. बाबा रामदेव यांनी म्हटले की, खरे तर काही लोकांचा स्वभाव असा आहे की ते भारतातील अन्न खातात आणि जगभरातील इतर देशांची गाणी गातात. जे सनातन भारत आणि भारतीयत्वाच्या विरोधात आहेत, ते आता असे करून आपल्याच देशाविषयी द्वेष पसरवत आहेत. तिथल्या लोकांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण करत आहेत, असेही बाबा रामदेव म्हणाले. मला वाटते की, नेत्यांनी अशी कामे अजिबात करू नयेत. ज्यांना नेते व्हायचे आहे ते भारतात राहून, भारतातील लोकांची मते घेऊन असे कसे वागू शकतात? हा विचार करून मला त्याच्या बुद्धिमत्तेची किव येते. राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. आत्तापर्यंत राहुल गांधी यांनी ब्रिटनमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. परदेशात दिलेल्या राहुल गांधींच्या काही भाषणांवर भाजपने आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा : NCP Support CM Rio: राष्ट्रवादी नागालँड सरकारमध्ये सहभागी होणार की बाहेरुन पाठिंबा देणार? वाढला सस्पेन्स