डेहराडून - रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी असल्याचे मत व्यक्त करणारे योग गुरु रामदेव बाबा आणि त्यांचे समर्थन करणारे आचार्य बालकृष्ण हे दोघेही सध्या चर्चेत आले आहेत. मात्र, या दोघांच्या बाबतीत एक असा प्रसंग आहे, की या दोघांनाही अॅलोपॅथी उपचारांना शरण जावे लागले होते.
हिमालयन रुग्णालयातील आय़सूयीत बाबा रामदेव-
4 जून 2011 या दिवशी विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी आणि देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी रामदेव बाबांनी दिल्लीत उपोषण सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारत त्यांचे उपोषण मोडून काढले. त्यानंतर रामदेव यांनी त्यांनी हरिद्वारमधील त्यांच्या आश्रमात उपोषणला सुरूवात केली. मात्र, 7 जूनला रामदेव बाबांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना त्याच दिवशी रुग्णवाहिकेतून डेहराडूनच्या हिमालयन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना थेट आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांच्या निगराणीत तत्काळ ग्लुकोज देण्यात आले.
डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याची माहिती देणारे बुलेटिन जारी करत सांगितले होते की, रामदेव बाबा यांचा ब्लड प्रेशर वाढत आहे. तसेच त्यांची तब्येत अशीच खालावत राहिली तर रामदेव कोमामध्ये जाण्याचा धोका असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानंतर आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि इतर साधू महंतांनी रामदेव बाबांना स्वत:चे आमरण उपोषण सोडण्याचा आग्रह केला. त्यानंतर 12 जूनला रामदेव बाबांनी आपण उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अॅलोपॅथी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर बाद बाबा डेहराडून स्थित हिमालयीन रुग्णालयातून ठणठणीत बरे होत आश्रमात परतले होते. त्याप्रमाणे आचार्य बालकृष्ण हे देखील एम्स रुग्णालयात उपचार घेऊन पतंजली योगपीठामध्ये आले होते.
अॅलोपॅथीच्या उपचारानेच रामदेव झाले नीट-
हिमालयन रुग्णालयात भरती झालेल्या बाबा रामदेव यांना स्पेशल वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांची तब्येत अत्यवस्थ होती. डॉक्टरांनीही त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी बाबा रामदेव यांचा ऑक्सिजन पल्स रेट 58, आणि रक्तदाब 104/70 आणि वजनात 5 किलो घट झाली होती. त्यावेळी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी तब्बल ५ डॉक्टरांचे एक पथक उपचाराकडे लक्ष ठेऊन होते, अशी माहिती त्यावेळी रामदेव बांबाच्या आरोग्याचे बुलेटीन प्रसिद्ध करणारे डॉक्टर जेठाणी यांनी ईटीव्ही भारतला दिली.
या आजाराने ग्रासले होते रामदेव-
ईटीव्ही भारतशी बोलताना डॉ. जेठानी म्हणाले की, रामदेव बाबांवर उपचार करताना आमचे पथक खूप चिंतेत होते. कारण आम्ही बाबा रामदेवांना देशाची संपत्ती समजून त्यांची काळजी करत होतो. रामदेव बाबांच्या मुत्राशयात अल्बुमिन आणि किटोनचे प्रमाण सातत्याने वाढत होते. त्यामुळे रुग्णालायतील सर्वच डॉक्टरांची काळजी वाढली होती. रामदेव बाबांचा रक्तदाब घटत होता, त्याच प्रमाणे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाणही घटत होते. त्यामुळे त्यांना सातत्याने ग्लुकोज दिले जात होते. जवळपास आठ दिवसांच्या उपचारानंतर रामदेव ठणठणीत बरे झाले आणि मगच पतंजली योगपीठात माघारी परतले.
त्यावेळी का घेतला अॅलोपॅथीचा उपचार ?
बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या टीकेवर बोलताना त्यांच्यावर त्यावेळी उपचार करणारे डॉ. जेठानी म्हणाले की, हे खूप दुर्दैवी आहे की, ज्या डॉक्टरांनी रामदेव यांचा जीव वाचवला आज त्याच डॉक्टरांना रामदेव बाबा वाईट संबोधत आहेत. मात्र, बाबा रामदेव जर इतके ज्ञानी आहेत, तर त्यावेळी का अॅलोपॅथीला शरण आले होते? आता रामदेव बाबांच्या वक्तव्यावर बोलणे म्हणजे त्यांना मोठे करण्यासारखे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तसेच रामदेव बाबांनी अॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीवर टीका केली असली तरीही आज अनेक डॉक्टर आपली सेवा बजावून हजारो जीव वाचवत असल्याचेही सांगत जेठानी यांनी रामदेव बाबांना उपरोधिक टोला लगावला.
आचार्य बालकृष्णांनीही घेतला अॅलोपॅथी उपचाराचा डोस-
अॅलोपॅथीवर टीका करणाऱ्या रामदेव बाबाच केवळ अॅलोपॅथीच्या उपचाराने बरे झाले आहेत असे नाही, तर त्यांचे सहकारी आणि पतंजली योगपीठात दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान असलेले आचार्य बालकृष्ण यांनी देखील आपला जीव वाचवण्यासाठी अॅलोपॅथीच्या उपचाराची मात्रा घेतली होती. 23 ऑगस्ट 2019 ला पतंजली योगपीठ महामंत्री आणि पतंजली आयुर्वेदचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
एम्सच्या डॉक्टरांनी केला बालकृष्ण यांच्यावर उपचार -
बालकृष्ण यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि एम्सचे तत्कालीन प्रवक्ते विमल कुमार यांनी सांगितले की, आचार्य बालकृष्ण यांना अन्नातून विषबाधा झाली होती, त्यानंतर त्यांनतर त्यांना एम्समगध्ये दाखल कऱण्यात आले. त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले होते. उत्तराखंड सरकारमध्ये तर खळबळ उडाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून चांगले उपचार देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानतंर बालकृष्ण अॅलोपॅथी उपचार घेऊन रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन पतंजली आश्रमात परतले होते.