पणजी - कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आयुर्वेद, योग आणि इतर यंत्रणा संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणालेत. भविष्यात अशा प्रकारच्या संकटाचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर देऊन आरोग्य सेवा पुरवण्याचे नवीन मॉडेल आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
साथीच्या परिणामामुळे समाज आणि आरोग्य सेवा प्रणालीत मूलभूत बदल घडतील. योगाद्वारे साथीनंतर उद्भवणार्या मानसिक आणि भावनिक समस्यांचे निराकरण देखील होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या राष्ट्रीय उपचारात आयुर्वेदाचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले. आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली होती. उपाचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.
देशभरात कोरोना रुग्णसंख्या -
देशात 4 लाख 40 हजार 962 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तब्बल 85 लाख 21 हजार 617 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 43 हजार 493 जणांना डिस्चार्ज दिला आहे. देशातील रिकव्हरी रेट 93.69 टक्के असून मृत्यू दर 1.46 टक्के एवढा आहे.
हेही वाचा - आता तरी लावा मास्क... कोरोना बाधित गावात एकटे ठाकूरच ठरले हीरो