ETV Bharat / bharat

Ayurveda Day 2022: 'हर दिन हर घर आयुर्वेद' या थीमवर साजरा केला जातोय आयुर्वेद दिन 2022

धनत्रयोदशीचा सण (dhantrayodashi Festival) आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो. या वर्षी आयुर्वेद दिन 2022 (Ayurveda Day 2022) 'हर दिन हर घर आयुर्वेद' (Har Din Har Ghar Ayurved) या थीमवर साजरा केला जात आहे.

Ayurveda Day 2022
आयुर्वेद दिन 2022
author img

By

Published : Oct 22, 2022, 11:02 AM IST

धनत्रयोदशीचा सण हा दिवाळी सणाचा प्रारंभ मानला जातो. धनतेरस ही धन्वंतरी जयंती (Dhanvantari Jayanti or dhantrayodashi) म्हणूनही साजरी केली जाते. आपल्या वेदांमध्ये भगवान धन्वंतरी यांना देवांचे वैद्य म्हटले आहे. तसेच त्यांना आयुर्वेदाचे जनक देखील मानले जाते हे उल्लेखनीय आहे. या वर्षी आयुर्वेद दिन 2022 (Ayurveda Day 2022) 'हर दिन हर घर आयुर्वेद' (Har Din Har Ghar Ayurved) या थीमवर साजरा केला जात आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून दरवर्षी धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी हा आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

आयुर्वेद (Ayurveda) आणि त्याच्या विविध वैद्यकीय पद्धती आणि त्याचे फायदे, तत्त्वे आणि उद्दिष्टे याविषयी देशातच नव्हे तर जगभरात सर्वांना माहिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी 'हर दिन हर घर आयुर्वेद' या संकल्पनेसह आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे. गेल्या काही वर्षांत विशेषतः कोरोनाच्या काळात देशातील तरुण पिढीतच नव्हे तर परदेशातही आयुर्वेदाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. कोरोनाच्या काळात शरीराला मुळात निरोगी बनवण्यात आणि संसर्ग टाळण्यासाठी त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यात आयुर्वेदाची औषधे खूप यशस्वी मानली जात होती. या काळातही आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि औषधांचा वापर खूप वाढला होता. परिणामी, सध्या मोठ्या संख्येने लोकांनी आयुर्वेदिक औषध आणि त्याचे नियम आपल्या जीवनात समाविष्ट केले आहेत.

आयुर्वेदिक औषध प्रणाली : आयुर्वेदिक वैद्यकीय ग्रंथांनुसार, ही एक वैद्यकीय प्रणाली आहे. ती जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवते, ज्यामुळे आयुष्य दीर्घ, निरोगी आणि आनंदी होऊ शकते. या वैद्यकीय पद्धतीमध्ये केवळ रोगावर तात्काळ उपचारच केले जात नाहीत, तर शरीर नैसर्गिकरीत्या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. त्यामुळे या औषध पद्धतीमध्ये रसायने (औषधे) आणि विविध उपचारपद्धतींबरोबरच आहार, योग आणि जीवनशैली यांचाही उपचार प्रक्रियेत समावेश होतो.

आयुर्वेद चिकित्सा पद्धती तीन दोषांवर आधारित आहे. वात, कफ, पित्त असे मानले जाते. आयुर्वेदानुसार या तिन गोष्टींचा व्यक्तीच्या शरीरात समतोल असेल तर ती निरोगी असते. परंतु या तिन्हीपैकी कोणत्याही एकामध्ये असंतुलन असल्‍याने माणसाला आजार होऊ शकतो. त्याच वेळी, असे मानले जाते की हे तीन दोष पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच घटकांवर प्रभाव पाडतात. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आयुर्वेदामध्ये शरीराला बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. सुरुवातीला माणूस आजारी पडत नाही आणि आजारी पडला तरी त्याच्या शरीराला फारसा त्रास होत नाही. तो लवकर बरादेखील होतो. आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाणारे रसायन हे औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून तयार केले जाते जे पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्याच वेळी, पंचकर्म सारख्या अनेक प्रकारच्या उपचारांचा देखील या उपचारामध्ये समावेश आहे. ज्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून बनविलेले तेल, पेस्ट आणि औषधे वापरली जातात.

आयुष मंत्रालयाचा अर्थपूर्ण प्रयत्न (Ministry of AYUSH, Government of India) : आयुर्वेद चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून (Ministry of AYUSH) दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इतर सरकारी आणि सामाजिक संस्था देखील सहभागी होतात. या वर्षी देखील मंत्रालयाच्या अंतर्गत सप्टेंबर महिन्यापासून एक छोटी व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्या अंतर्गत पाच थीमवर प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.