लखनऊ ( उत्तरप्रदेश ) - प्रभू राम हे आस्थेचा विषय आहे, त्यामुळे रामदर्शनावरुन राजकारण नको असे मत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त ( Aaditya Thackeray Ayodhya Tour ) केले. लखनऊ विमानतळावर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
-
#WATCH | UP: Maharashtra Min Aaditya Thackeray arrives in Lucknow ahead of Ayodhya visit
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"When we came for the 1st time in 2018, we said 'pehle mandir, phir sarkaar'... I'll offer prayers & receive blessings... the land is not political, it's the land of 'Ram Rajya'," he said pic.twitter.com/E8y5NSHqBJ
">#WATCH | UP: Maharashtra Min Aaditya Thackeray arrives in Lucknow ahead of Ayodhya visit
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 15, 2022
"When we came for the 1st time in 2018, we said 'pehle mandir, phir sarkaar'... I'll offer prayers & receive blessings... the land is not political, it's the land of 'Ram Rajya'," he said pic.twitter.com/E8y5NSHqBJ#WATCH | UP: Maharashtra Min Aaditya Thackeray arrives in Lucknow ahead of Ayodhya visit
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 15, 2022
"When we came for the 1st time in 2018, we said 'pehle mandir, phir sarkaar'... I'll offer prayers & receive blessings... the land is not political, it's the land of 'Ram Rajya'," he said pic.twitter.com/E8y5NSHqBJ
अयोध्येकडे रवाना : मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे श्री राम लल्लाच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मुंबईहून सकाळीच विमानाने आदित्य ठाकरे हे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आता ते अयोध्येकडे रवाना झाले आहेत.
शिवसैनिक रेल्वेने अयोध्याला रवाना- 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्याला जाणार ( Aditya Thackeray leave for Ayodhya ) असले तरी कालपासूनच राज्यभरातून शिवसैनिक अयोध्याला पोहोचायला सुरुवात झाली ( Aditya Thackeray Ayodhya visit ) आहे. खासकरून पुणे मुंबई नाशिक येथून शिवसैनिक अयोध्याला रवाना झाले आहेत. मात्र अयोध्येत कोणतेही शक्तिप्रदर्शन शिवसेनेला करायचे नाही. अयोध्या हे हिंदू साठी श्रद्धास्थान आहे. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे तिकडे जात असल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनीमाध्यमांशी बोलताना दिले.