अयोध्या Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. भक्त प्रभू श्रीरामाच्या विहंगम दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाचा पहिला फोटो समोर आलाय. हा फोटो रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचा आहे. फोटोत श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, कपाळावर टिळा आणि हातात धनुष्यबाण दिसतोय.
51 इंचाची मूर्ती : रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो जेव्हा पहिल्यांदा समोर आला तेव्हा मूर्ती पांढऱ्या कपड्यानं झाकलेली होती. ही 51 इंचाची मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. ती गुरुवारी पहाटे मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर दुपारी तिची गर्भगृहात स्थापना करण्यात आली. रामललाला गर्भगृहात मंत्रोच्चारात विराजमान करण्यात आलं.
रामललाचं आसन : रामलल्लाची मूर्ती बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्यानं राम मंदिर परिसरात आणण्यात आली. याचे काही छायाचित्रंही समोर आले आहेत. रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी त्यांचं आसनही तयार करण्यात आलं. हे आसन 3.4 फूट उंच असून, ते मकराना दगडानं बनलेलं आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिर जनतेसाठी खुले होण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उद्घाटनाच्या दिवशी केवळ आमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.
मंगळवारपासून सहा दिवसीय विधी सुरू : 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी, मंगळवारपासून सहा दिवसीय विधी सुरू करण्यात आले. आज विधीचा चौथा दिवस आहे. सकाळी अरणी मंथनानंतर गणपतीची पूजा करण्यात आली. याशिवाय सर्व द्वारपालांचंही पूजन करण्यात आलं. अरणी मंथनातून निघालेल्या अग्नीची तलावात स्थापना करण्यात आली. यानंतर रामलल्ला केशर-तुपात विसावा घेतील.
हे वाचलंत का :