ETV Bharat / bharat

Lifetime Achievement Award : दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान - क्रिकेटच्या लेटेस्ट बातम्या

दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान ( Lifetime Achievement Award to Dilip Vengsarkar ) करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यपालांच्या व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले.

Dilip Vengsarkar
Dilip Vengsarkar
author img

By

Published : Mar 20, 2022, 8:08 PM IST

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर ( Cricketer Dilip Vengsarkar ) यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यपालांच्या व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांच्या हस्ते, सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 ( CSR Journal Excellence Award 2021 ) प्रदान करण्यात आले. त्यावेळी वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. pic.twitter.com/qFR43MgH7Z

    — Governor of Maharashtra (@maha_governor) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मी स्वतःच्या पैशाने कधीच पब्लिसिटी केली नाही - गडकरी

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी मागील 15 ते 20 वर्षापासून अशाच कार्यक्रमात एनर्जी खर्च करतो. या पैशातून समाजातील शोषित पीडित लोकांना मदत होते. मी हे मानतो जी मदत भेटते ती एकदा घ्यावी परत नाही. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. मी भाजप अध्यक्ष होतो, तेव्हा सर्वांना सांगितले काही सोशल वर्क करावे लागेल. जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन. मला कोणी एअरपोर्टवर घेण्यासाठी आलेले चालत नाही. सत्कार समारंभ मला चालत नाहीत. मी आयुष्यात कधीच स्वतःच्या पैशाने कट आऊट लावले नाहीत, माझी पब्लिसिटी केली नाही. नागपुरात टॉयलेटच पाणी शुद्ध करून विकले जाते, ज्याचे आम्हाला 325 करोड भेटतात. आयुष्यात फक्त दोनदाच हार विकत घेतले. एकदा लता मंगेशकर व एकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी, असे सांगत जनतेसाठी काम करा जनता तुमच्यासाठी उभी राहील. असा सल्लाही त्यांनी या प्रसंगी दिला. तसेच एखादे काम करताना सरकारी अधिकाऱ्याकडे जाऊ नका .नाहीतर चालणारी योजना बंद होईल, असे सांगत आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला.

गडकरी चालते-बोलते विद्यापीठ- मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की माझे मार्गदर्शक, नेता, भारत विकास पुरुष नितीन गडकरी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद झाला आहे. मी सीएसआर जर्नलचे आभार मानतो. 1989 साली लूना मोपेटवर नितीनजी सोबत फिरून, मी माझं राजकीय जीवन सुरू केलं. मी माझ्या जिल्ह्यात सीएसआरच्या माध्यमातून काम केलं. 'गरीबो की सूनो, वह तुम्हारी सूनेगा', असे सांगत आज पुरस्कार घेताना ऊर्जा तर भेटली आहे. गडकरी हे चालते-फिरते विद्यापीठ आहेत. आयटीसी बरोबर 1200टन अगरबती निर्माण करण्याचं काम आम्ही केले. आत्मनिर्भर भारतची सुरुवात आम्ही टूथ पेस्टने केली. रतन टाटा यांना पत्र लिहून एक कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर व एक वाराणसी येथे उघडले गेले, असेही ते म्हणाले. सेंट्रल विस्टाला चंद्रपूरच कार्पेट वापरले जावे, अशी इच्छा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

देवतुल्य व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात यावा- राज्यपाल

देशातील विविध लोकोपयोगी सामाजिक प्रकल्प राबविण्यात कॉर्पोरेट्स आपल्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहेत. काही कॉर्पोरेट्स कायद्यातील अनिवार्य तरतुदींना अनुसरून सामाजिक कार्यांसाठी योगदान देतात. मात्र अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा नागरिकांचे स्वतःचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे, असे सांगून समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या देवतुल्य व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात यावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. तसेच करोना संसर्गाच्या काळात केवळ कॉर्पोरेट्स व मोठ्या संस्थांनीच नाही, तर सामन्यात सामान्य व्यक्तीने देखील चांगले कामे केले, असे सांगून राज्यपालांनी सर्व विजेत्या संस्थांचे अभिनंदन केले.

देशी झाडे लावणे महत्त्वाचे- सयाजी शिंदे

या प्रसंगी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, माझा अवॉर्डवर विश्वास नाही पण लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अवॉर्ड घेणे गरजेचे आहे. नवीन पिढीने हे लक्षात ठेवायला पाहिजे की, देशी झाडे लावणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरे कॉलनीत जागा उपलब्ध झाली तर बरे होईल. झाड सर्वात जास्त सेलिब्रिटी आहे. हे फक्त ऑक्सिजन देऊ शकते. झाडांना त्यावर राहणाऱ्या पक्षांची काळजी असते. प्रत्येक शाळेत एक सीड बँक तयार करण्याचा सल्लाही त्यांनी या प्रसंगी दिला. कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. वृक्ष संवर्धन संदर्भात 45 ठिकाणी महाराष्ट्रात काम चालू असून प्रत्येक ठिकाणी वनराई निर्माण व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक 15 ऑगस्टला प्रत्येक गावात 100 झाडे देण्यात यावीत. राष्ट्रीय वृक्ष वड वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

राज्यपालांच्या व गडकरींच्या हस्ते विविध संस्थांचा गौरव-

राज्यपालांच्या हस्ते यावेळी जिंदाल स्टील व पॉवर, आयसीआयसीआय लोंबार्ड, महिंद्रा अँड महिंद्रा रूरल हाऊसिंग यांसह निवडक संस्थांना कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार देण्यात आले. तर गडकरी यांच्या हस्ते डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांचे सत्कार करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन करणाऱ्या प्रसिद्ध तृतीयपंथी मॉडेल सुशांत दिवगीकर यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्ही सैन्यदलांचे माजी संयुक्त प्रमुख दिवंगत जनरल बिपीन रावत, भारतरत्न लता मंगेशकर व सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.