ETV Bharat / bharat

Aurai Panchayat Bhawan Sold : बिहारमध्ये भ्रष्टाचाराचा गाठला कळस; पंचायत भवनची इमारत पाडून विटांसह भंगाराची विक्री

बिहारच्या मुझफ्फरपूरच्या औरई ब्लॉकमधील औरई पंचायत भवन कोणत्याही परवानगीशिवाय ( Aurai block of Muzaffarpur sold ) विकण्यात आली आहे. गावाचे सरपंच आणि पंचायत सचिव यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा आरोप ( gov building demolished by JCB ) आहे. दोघांनी मिळून इमारत जेसीबीने पाडली. इमारतीची प्रत्येक वीट विकायला सुरुवात ( Panchayat Bhawan sold in Bihar ) केली.

Aurai Panchayat Bhawan Sold
पंचायत भवनची इमारत विकली
author img

By

Published : May 10, 2022, 7:40 PM IST

पाटना - बिहारमध्ये सध्या सरकारी इमारती आणि वस्तू विकण्याचा ट्रेंड ( trend of selling government properties ) सुरू झाला आहे. राज्यातील पूर्णिया कोर्ट स्टेशन आणि रोहतास जिल्ह्यातून लोखंडी पूल चोरीला गेल्याच्या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर बिहारमध्ये सरकारी मालमत्ता विकण्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळी बिहारचे महसूल मंत्री रामसूरत राय यांच्या ( Bihar Revenue Minister Ramsurat Rai ) विधानसभा मतदारसंघातील सरकारी पंचायत भवन ( Panchayat Bhavan sold in Muzaffarpur ) पाडून विकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

पंचायत भवन विकले गेले - बिहारच्या मुझफ्फरपूरच्या औरई ब्लॉकमधील औरई पंचायत भवन कोणत्याही परवानगीशिवाय विकण्यात आली आहे. गावाचे सरपंच आणि पंचायत सचिव यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा आरोप ( gov building demolished by JCB ) आहे. दोघांनी मिळून इमारत जेसीबीने पाडली. इमारतीची प्रत्येक वीट विकायला सुरुवात ( Panchayat Bhawan sold in Bihar ) केली. याबाबत मुख्याधिकारी आणि सचिवांच्या या कृतीमुळे स्थानिकांमध्येही नाराजी आहे. दोघांवर सरकारी मालमत्तेची नासधूस, आर्थिक अनियमितता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून माहिती लपविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी, या प्रकरणी ब्लॉक पंचायती राज अधिकारी गिरिजेश नंदन यांनी मुखिया आणि पंचायत सचिवांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

पंचायत भवनची इमारत पाडून विटांसह भंगाराची विक्री

15 वर्षे जुने पंचायत भवन - औराई पंचायत भवन 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. बांधकामातील अनियमिततेमुळे एका कर्मचाऱ्याला तुरुंगातही जावे लागले. 15 वर्षांनंतर हीच इमारत मुखिया व पंचायत सचिवांनी जेसीबीने पाडून इमारतीचे भंगार विकले. पंचायत भवन पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीपीआरओने घेतली दखल - हे प्रकरण समोर आल्यानंतर बीपीआरओ (ब्लॉक पंचायत राज अधिकारी) यांनीही दखल घेतली आहे. बीपीआरओने सांगितले की, "तक्रार मिळाल्यानंतर, साइटची तपासणी करण्यात आली. पंचायत इमारत पाडून लिलाव न करता विक्री केल्याचे आढळून आले. त्याचा अहवाल जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. आरोपी पंचायत सचिव रामनरेश साहनी यांचा फोन सतत बंद आहे. सरपंच उमाशंकर गुप्ता म्हणाले, की औराई पंचायत भवन जीर्ण अवस्थेत होते. कुठेही बसायला जागा नव्हती. त्यामुळे बीडीओसह अन्य अधिकाऱ्यांच्या संमतीने ही इमारत पाडण्यात आली आहे. त्याच ठिकाणी इमारत बांधली जाईल. तिथे बसून विकासाला गती मिळेल, असा त्यांनी दावा केला.

तपास सुरू आहे- बीडीओ - बीडीओ महेश्वर पंडित यांना या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच सरकारी इमारत लिलावाशिवाय विकणे हा गुन्हा असल्याचे सांगितले. यामध्ये जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

याआधीही घडली होती चोरीची घटना: रेल्वे इंजिन विकल्याची घटना पहिल्यांदा पूर्णियामध्ये समोर आली होती. काही दिवसांनी रोहतास येथून पूल विकल्याची माहिती समोर आली होती. सरकारी माल विकण्याची प्रक्रिया इथेच थांबली नाही. त्यानंतर मुझफ्फरपूरमधील सरकारी रुग्णालयच विकले गेले होते. याआधी बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज येथील आदर्श गावात अमियावारमध्ये 60 फूट लांबीचा पूल चोरीला गेला होता. तेव्हापासून विरोधकांनी या प्रकरणाबाबत सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली होती.

हेही वाचा-Athawale On Rana Couple : राणा दाम्पत्यावर दलित असल्यामुळे अन्याय - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हेही वाचा-Baby Berth in Railway- पाच वर्षांहून कमी वयाची बालके असणाऱ्या मातांकरिता रेल्वेमध्ये खास 'बेबी बर्थ'

हेही वाचा-आयात केलेल्या मोटर रोटरमध्ये 5.8 किलोच्या सोन्याच्या डिस्क; डीआरआयकडून मुंबईमधील आयातदाराला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.