ETV Bharat / bharat

Atiq Ashraf Murder Case : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी मीडियाची एंट्री बॅन, हे आहे कारण - अतिक अहमद आणि अशरफ

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर आता लखनौच्या कालिदास मार्गावर पत्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. कालिदास मार्गावरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्र्यांचे निवासस्थान आहे. अतिकचे मारेकरी मीडिया पर्सन बनून आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Atiq Ashraf Murder Case
योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी मीडियावर बंदी
author img

By

Published : Apr 16, 2023, 6:11 PM IST

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या करणारे शूटर पत्रकार बनून आले होते. त्यामुळे आता खबरदारी म्हणून राजधानी लखनौच्या कालिदास मार्गावर कोणत्याही मीडिया पर्सनच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. कालिदास मार्गावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. याशिवाय कालिदास मार्गावरील सुरक्षा बंदोबस्त अधिक तगडा करण्यात आला आहे.

राज्यभर हाय अलर्ट जारी : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना काल रात्री उशिरा प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना तीन शूटर्सनी निर्दयीपणे गोळीबार करून ठार केले. हे तिन्ही शूटर मीडिया पर्सनच्या रूपात घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेनंतर राज्यभर हाय अलर्ट जाहीर करताना राज्यातील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सोबतच लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कालिदास मार्गाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

कालीदास मार्गावर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान : कालिदास मार्गावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, कॅबिनेट मंत्री सुरेश खन्ना, दयाशंकर सिंह, सूर्य प्रताप शाही, धरमवीर प्रजापती यांच्यासह डझनभर मंत्र्यांची निवासस्थानेही कालिदास मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत बाहेरील व्यक्ती तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रवेशावर येथे बंदी घालण्यात आली आहे.

माध्यमांसाठी बनवल्या जाऊ शकते एसओपी : प्रयागराज घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा तीन सदस्यीय न्यायिक समिती स्थापन केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दर दोन तासांनी डीजीपी आणि प्रधान सचिव गृह यांच्याकडून अहवाल मागवत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रयागराजमधील घटनेबाबत राज्य सरकारकडून अहवालही मागवला होता, जो गृह खात्याने सोपवला आहे. या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय माध्यमांबाबत एसओपी जारी करू शकते, असे मानले जात आहे.

हेही वाचा : Shani Killer Of Atiq : अतिक आणि अशरफचा मारेकरी सनी 15 वर्षांपासून गेला नाही घरी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.