सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : उमेश पाल हत्याकांडात 5 लाखांचे बक्षीस असलेल्या गुड्डू मुस्लिमचा यूपी पोलीस जोमाने शोध घेत आहेत. गुड्डू मुस्लिम हा मूळचा सुलतानपूरच्या गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील इटकौली गावचा रहिवासी आहे. गुड्डू मुस्लिमचे गावातील घर उद्ध्वस्त झाले आहे. गुड्डूचे वडील कुष्ठरोगामुळे सुलतानपूरहून प्रयागराजला गेले होते. त्यानंतर कधीच गावात परत आले नाहीत.
गुड्डू मुस्लिमवर अनेक गुन्हे दाखल : इटकौली हे गाव शहरापासून 8 किमी अंतरावर आहे. गावाच्या जवळून गोमती नदी वाहते. या गावात मुस्लिम लोकसंख्या सुमारे 2500 आहे. येथील काही लोक रोजगाराच्या निमित्ताने सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये गेले आहेत. तर काही सैन्यात आणि सरकारी नोकरीत आहेत. गुड्डू मुस्लिम याच गावात जन्माला आला. प्रयागराजला गेल्यानंतर गुड्डू मुस्लिम माफिया अतिक अहमदच्या संपर्कात आला. यानंतर तो अतिकचा उजवा हात बनला. गुड्डू मुस्लिमवर उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये हत्येसह अनेक गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
गुड्डू सहा वर्षांचा असताना वडील सोडून गेले : गुड्डू मुस्लिम 6 वर्षांचा असताना त्याचे वडील शफीक उर्फ मिठ्ठन हे गाव सोडून गेले होते. यानंतर ते प्रयागराजच्या शिवकुटी पोलिस स्टेशनच्या लालाच्या सराईत जाऊन स्थायिक झाले. तेव्हापासून आजतागायत गुड्डूचे वडील इथे परत आले नाहीत. एवढेच नाही तर गुड्डू मुस्लिमही त्यानंतर गावात आला नाही. मिठ्ठनला कुष्ठरोग झाल्याचे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे लोक त्यांच्या घरी येत - जात नव्हते. अशा परिस्थितीत मिठ्ठनने गाव सोडणेच योग्य मानले. आज मिठ्ठनच्या घराची पडझड झाली आहे. त्यांच्याकडे शेती नव्हती. लोकांनी असेही सांगितले की, गुड्डू मुस्लिमच्या वडिलांना चार भाऊ होते. एकाचे कुटुंब गावातच राहते. दुसरे कुटुंब अयोध्येत आणि तिसरे लखनौमध्ये आहे.
तीन भावांपैकी गुड्डू एकटाच उरला : लोकांनी सांगितले की गुड्डूला दोन भाऊ होते. त्याच्या एका भावाचा प्रयागराजमध्ये मृत्यू झाला असून दुसऱ्याचा सौदी अरेबियात काम करताना मृत्यू झाला आहे. मात्र, ते गुड्डू मुस्लिमला चेहऱ्यावरून ओळखत नसल्याचं लोक सांगतात. कारण इथून निघून गेल्यावर तो कधीच गावात आला नाही. जेव्हापासून उमेश पाल खून प्रकरण माध्यमांसमोर आले तेव्हापासून तो आला नाही. पोलिस अधीक्षक सोमेन वर्मा यांनी सांगितले की, गुड्डू मुस्लिमशी संबंधित प्रकरणाचा तपास एसटीएफ करत आहे. आतापर्यंत सुलतानपूर पोलिसांची कोणतीही भूमिका थेट समोर आलेली नाही. आवश्यक गुन्हेगारी घटक आढळल्यास, कायदेशीर कारवाई सुनिश्चित केली जाईल.
हेही वाचा : Mafia Mukhtar Ansari Sentenced : मुख्तार अंसारीचा झाला फैसला, न्यायालयाने ठोठावली दहा वर्षाची शिक्षा