ETV Bharat / bharat

Assembly Elections 2023 : एमपीसह छत्तीसगडमध्ये विजय निश्‍चित, राजस्थानमध्ये जोरदार लढत, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल - Ramesh Bidhuri

Assembly Elections 2023 : जात जनगणनेच्या मागणेवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा बिधुरीसारख्या खासदारांचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना, राज्यस्थानमध्ये काँग्रेसचा विजय होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

Assembly Elections 2023
Assembly Elections 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:03 PM IST

नवी दिल्ली Assembly Elections 2023 : आगामी निवडणुकांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, कर्नाटकात आम्ही एक महत्त्वाचा धडा शिकलो आहोत. भाजपा लक्ष वळवून निवडणुका जिंकतो, हाच धडा आहे असं राहुल म्हणाले. राहुल गांधी आज दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. काॅंग्रेस मध्य प्रदेश, छत्तीसगढ जिंकत आहे. कदाचित तेलंगानामध्येही आम्ही जिंकू तसंच राजस्थानमध्ये अटीतटीचा लढा होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

लक्ष हटवण्यासाठी भाजपाचे डावपेच : भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बसपा नेते दानिश अली यांच्याविरोधात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून झालेल्या वादाचाही राहुल गांधींनी उल्लेख केला. जात जनगणनेच्या मागणीवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपा असे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक एकत्र काम करत असून 2024 च्या निवडणुकांबद्दल भाजपाला आश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

संपत्तीचं केंद्रीकरण : 'एक देश-एक निवडणूक' या संकल्पनेचा उद्देश खऱ्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवणं आहे. "ही भाजपाची लक्ष विचलित करण्याची रणनीती आहे. भारतातील मुख्य समस्या म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण, संपत्ती वितरणातील असमानता, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, कनिष्ठ जाती-ओबीसी, आदिवासी समुदायांवर होणारा अन्याय महागाई आदी विषायाचाही त्यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला.

हरण्याचा प्रश्नच नाही : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणतेही राज्यात हारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयाबद्दल विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, "मी म्हणेन, सध्या आम्ही तेलंगणा, मध्य प्रदेश छत्तीसगड जिंकत आहोत. राजस्थानातही आम्ही विजयाच्या खूप जवळ आहोत.

हेही वाचा -

  1. PM Modi Visit Varanasi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी
  2. One Nation One Election First Meeting : 'वन नेशन वन इलेक्शन' कमिटीच्या पहिल्या बैठकीत घेतला 'हा' निर्णय
  3. Sharad Pawar: गौतम अदानींच्या प्लांटचं चक्क शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, काँग्रेससह 'इंडिया'च्या भुवया उंचावल्या?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.