ETV Bharat / bharat

आसाममधील जवान हुतात्मा, वारसांना २० लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा

चंद्रा रॉय २००१ साली लष्करात भरती झाले होते. ते ५९ फिल्ड आर्टिलरी विभागात कर्तव्यावर होते. शत्रुशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे...

Assam govt announces Rs 20 lakh ex gratia to kin of jawan killed in ceasefire violation
आसाममधील हुतात्मा जवानाच्या कुटुंबीयांना मिळणार २० लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा
author img

By

Published : Nov 16, 2020, 1:41 PM IST

गुवाहाटी : पाकिस्तानने शुक्रवारी केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये देशाच्या चार जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये आसामच्या एका वीरपुत्राचाही समावेश होता. या जवानाचे पार्थिव आज त्याच्या मूळ गावी पोहोचले असून, त्यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हुतात्मा चंद्रा रॉय यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी रॉय यांना आर्मी बेस रुग्णालयात श्रद्धांजली वाहिली. रॉय हे अमर राहतील, आणि त्यांची शौर्यगाथा ही येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे ते यावेळी म्हणाले.

चंद्रा रॉय २००१ साली लष्करात भरती झाले होते. ते ५९ फिल्ड आर्टिलरी विभागात कर्तव्यावर होते. शत्रुशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यामागे आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे.

चंद्रा यांच्यासोबत पश्चिम बंगाल राज्यातील सुबोध घोष हे २४ वर्षीय जवान शहीद झाले. सुबोध चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली.

महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण..

महाराष्ट्रातील नागपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानही शहीद झाले होते. कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले. तर नागपूरमधील काटोल येथील भूषण सतई या जवानाला वीरमरण आले आहे. या दोघांवरही आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत.

हेही वाचा : नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.