ETV Bharat / bharat

तालिबानींच्या समर्थनार्थ पोस्ट करणे पडले महागात...14 जणांना आसाम पोलिसांकडून अटक

समाज माध्यमांमध्ये पोस्ट करून तालिबानींचे समर्थन करणाऱयांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कारण, हे देशाच्या सुरक्षेला हानीकारक असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Assam cops nab 14 people
Assam cops nab 14 people
author img

By

Published : Aug 21, 2021, 7:29 PM IST

Updated : Aug 21, 2021, 7:46 PM IST

गुवाहाटी - तालिबानींच्या समर्थनार्थ समाज माध्मयात पोस्ट करणे आसाममधील नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. अशा पोस्ट करणाऱ्या 14 नागरिकांना आसाम पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य, आयटी कायदा अशा विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे.

डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल वायवोलेट बरुराह म्हणाल्या, की आम्ही चिथावणीखोर पोस्ट बाबात अलर्ट आहोत. समाज माध्यमात देखरेख करत आहोत. कामरुप मेट्रोपोलिटियन, बारपेटा, धुब्री आणि करीमगंज जिल्ह्यातून प्रत्येकी दोन जणांना अटक केली आहे. तर दररंग, काछर, हैलाकंडी, दक्षिण सालमारा, गोलपारा आणि होजाई जिल्ह्यातून प्रत्येकी एकाला अटक केली आहे.

हेही वाचा-पंजाबमधील पठाणकोटमध्ये प्रशिक्षणादरम्यान सैन्यदलाच्या जवानाचा मृत्यू, दोन जवान गंभीर

समाज माध्यमांमध्ये पोस्ट करून तालिबानींचे समर्थन करणाऱ्यायांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कारण, हे देशाच्या सुरक्षेला हानीकारक आहे. आम्ही अशा लोकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत. जर तुमच्या निर्दर्शनास आले तर पोलिसांना माहिती द्या, असे बरुराह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा-राकेश अस्थाना हे मोदींचे ब्रम्हास्त्र..मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधानांवर केला 'हा' गंभीर आरोप

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्त्यांसह शायर राणा यांनी तालिबानींना दिले जाहीर समर्थन

उत्तर प्रदेशमध्ये तालिबानींचे समर्थन करणारे वक्तव्य समाजातील मान्यवर व्यक्तींनी केली होती. समाजवादी पक्षाचे खासदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री मौसाना मसूद मदनी यांच्यानंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी तालिबानींना समर्थन (Munawwar Rana Support Taliban) देणारे वक्तव्य केले. तालिबानी लोक वाईट नाहीत. परिस्थितीमुळे ते तसे झाल्याचे राणा यांनी अजब वक्तव्य केले.

हेही वाचा-तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका; नागरिक विमानतळाच्या दिशेने रवाना

Last Updated : Aug 21, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.