नवी दिल्ली 4 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आशिया चषक 2022 Asia Cup Cricket 2022 चे आयोजन करण्यात येत आहे. 15 दिवसांत एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. 27 ऑगस्टपासून क्रिकेटची ही लढाई सुरू होत आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका AFG vs SL यांच्यात पहिला सामना होणार आहे. तसेच अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषक 2022 सुरु होण्याआधी या आशिया चषकाबद्दलच्या या खास गोष्टी जाणून घेऊयात.
आशिया कप क्रिकेट इतिहास Asia Cup Cricket History
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे BCCI Chairman NKP Salve यांच्या पुढाकाराने 1984 मध्ये आशिया कपची स्थापना झाली. पहिली स्पर्धा UAE मध्ये आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर तिचे विजेतेपद सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नावे झाले. तेव्हापासून, एकूण 14 वेळा हे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताने सर्वाधिक 7 वेळा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. श्रीलंकेने ही ट्रॉफी 5 वेळा जिंकली आहे, तर पाकिस्तानला ही स्पर्धा दोनदा जिंकता आली आहे. यासह भारत तीन वेळा उपविजेता ठरला आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ दोनदा अंतिम फेरीत धडक मारूनही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात आशिया कप वेगवेगळ्या नावाने खेळला गेला. पहिल्यांदा रथमन्स कप, दुसऱ्यांदा जॉन प्लेअर गोल्ड लीफ ट्रॉफी, तिसऱ्यांदा विल्स आशिया कप, पाचव्या आणि सहाव्यांदा पेप्सी आशिया कप, पण 1997 नंतर तो फक्त आशिया कप या नावानेच खेळला जात आहे.
आयोजक श्रीलंका पण सामने UAE मध्ये
यावेळी आशिया चषक युएईमध्ये आयोजित केला जात असला तरी त्याचे आयोजन श्रीलंका क्रिकेट बोर्ड करणार आहे. यापूर्वी हा आशिया कप 2020 मध्ये श्रीलंकेत होणार होता, नंतर तो कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आणि त्यानंतर 2021 मध्ये श्रीलंकेत आयोजित केला जाणार होता, परंतु कोरोनाचा धोका टळला नाही. त्यानंतर ते पुढील वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले. आता 2022 मध्ये आशिया चषक स्पर्धेच्या 15 व्या स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्या, तेव्हा श्रीलंकेच्या बिघडलेल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे तो यूएईला हलवावा लागला.
आशिया चषक स्पर्धेतील संपूर्ण वेळापत्रक Asia Cup 2022 Schedule
- 27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
- 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान
- 30 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
- 31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हाँगकाँग
- 1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
- 2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग
आशिया चषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामन्यांनंतर, सुपर 4 खेळला जाईल, ज्यामध्ये दोन्ही गटातील शीर्ष 2 संघ पात्र ठरतील. या टप्प्यावर, राऊंड रॉबिनच्या आधारावर, संघाला चॅम्पियन मोहीम पुढे नेण्यासाठी इतर तीन संघांविरुद्ध 1-1 सामने खेळावे लागतील.
सुपर 4 पूर्ण वेळापत्रक
- 3 सप्टेंबर - B1 विरुद्ध B2
- 4 सप्टेंबर - A1 विरुद्ध A2
- 6 सप्टेंबर - A1 विरुद्ध B1
- 4 सप्टेंबर - A2 विरुद्ध B2
- 9 सप्टेंबर - A1 विरुद्ध B2
- 9 सप्टेंबर - B1 विरुद्ध A2
सुपर 4चा टप्पा संपल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
हेही वाचा - Asia Cup 2022 पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये गाळला घाम