दुबई : आशिया कप 2022 ( Asia Cup 2022 ) मध्ये भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) पुन्हा एकदा भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (4 सप्टेंबर) होणाऱ्या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या हायव्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या ( Captain Rohit Sharma ) हाती असेल. त्याचवेळी बाबर आझम ( Captain Babar Azam ) पाकिस्तानी संघाची धुरा सांभाळणार आहे. मागील रविवारीच भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता, त्यामुळे त्यांचा उत्साह खूप उंचावला आहे.
तसेच, जर आपण आशिया चषकाच्या इतिहासावर ( History of Asia Cup ) नजर टाकली तर भारतीय संघ आपल्या शेजारी देशावर नेहमीच भारी पडला आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 15 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 9 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी पाकिस्तान संघाने पाच सामने जिंकले आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. आजच्या सामन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या संघाकडून विजयाची अपेक्षा आहे.
-
Match Day 👊
— BCCI (@BCCI) September 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ready for the #INDvPAK game 💪#TeamIndia | #Asiacup2022 pic.twitter.com/foLgZHoWZ3
">Match Day 👊
— BCCI (@BCCI) September 4, 2022
Ready for the #INDvPAK game 💪#TeamIndia | #Asiacup2022 pic.twitter.com/foLgZHoWZ3Match Day 👊
— BCCI (@BCCI) September 4, 2022
Ready for the #INDvPAK game 💪#TeamIndia | #Asiacup2022 pic.twitter.com/foLgZHoWZ3
भारताला जडेजाची भासणार उणीव -
या सामन्यात भारताला रवींद्र जडेजाची उणीव भासणार ( Ravindra Jadeja will be missed ) आहे, जो दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात घेण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन तयार केले. कारण त्या सामन्यात ऋषभ पंतला वगळण्यात आले होते.
रविवारीही कर्णधार रोहित शर्मा आणि द्रविड असाच सट्टा खेळतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. डाव्या हाताच्या फलंदाजाचा टॉप-6 फलंदाजांमध्ये समावेश करायचा असेल, तर त्यासाठी फक्त पंत हाच पर्याय आहे. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू ( All-rounder Hardik Pandya ) कामगिरीमुळे भारताला पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवून देण्यात मदत झाली. या सामन्यातही रोहितला त्याच्या इतर खेळाडूंकडून त्याच कामगिरीची अपेक्षा असेल. विराट कोहलीला ( Star batsman Virat Kohli ) देखील आपला फॉर्म गवसला आहे.
आशिया कपमधील भारत-पाक सामन्यांचे निकाल:
- 1984: भारत 84 धावांनी विजयी, शारजाह
- 1988: भारत 4 गडी राखून जिंकला, ढाका
- 1995: पाकिस्तान 97 धावांनी विजयी, शारजाह
- 1997: निकाल नाही, कोलंबो
- 2000: पाकिस्तान 44 धावांनी विजयी, ढाका
- 2004: पाकिस्तान 59 धावांनी विजयी, कोलंबो
- 2008: भारत 6 गडी राखून जिंकला, कराची
- 2008: पाकिस्तान 8 विकेट्सने जिंकला, कराची
- 2010: टीम इंडिया 3 गडी राखून जिंकली, दांबुला
- 2012: भारत 6 गडी राखून जिंकला, मीरपूर
- 2014: पाकिस्तान 1 विकेटने जिंकला, मीरपूर
- 2016: भारत 5 गडी राखून जिंकला, मीरपूर
- 2018: भारत 8 गडी राखून विजयी, दुबई
- 2018: भारत 9 गडी राखून विजयी, दुबई
- 2022: भारताचा 5 गडी राखून विजय, दुबई
भारताला झटपट सुरुवात करावी लागेल -
पॉवर-प्लेमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांची बचावात्मक वृत्ती अडचणीची ठरत आहे. सुरुवातीला हाँगकाँगसारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारतीय संघाने संथ फलंदाजी केली परंतु सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. केएल राहुलने ( Vice Captain KL Rahul ) 39 चेंडूत 36 धावा केल्या. यावरून भारतीय टॉप ऑर्डरच्या संथ खेळाचा अंदाज लावता येतो. अशा स्थितीत भारत ओपनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुलचा फॉर्म चिंतेचे कारण -
पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नसीम शाहच्या पहिल्याच चेंडूवर राहुल ( KL Rahul form concerns ) बोल्ड झाला. त्याला आणखी एक संधी द्यावी लागेल पण त्याला खेळण्याची शैली बदलावी लागेल. पाकिस्तानच्या फलंदाजांनाही पहिल्या 10 षटकांमध्ये अधिक धावा कराव्या लागतील. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी पाठलाग करताना चांगले यश मिळवले आहे, परंतु प्रथम फलंदाजी करताना ते फ्लॉप ठरले आहेत.
अश्विनला मिळू शकते संधी -
याशिवाय दुबईची खेळपट्टी संथ असल्याने फलंदाजांना अडचणी निर्माण होऊ शकतात. आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही हा भारतासमोरचा आणखी एक प्रश्न आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात आवेश खान चांगलाच महागात पडला. पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमधील सहापैकी दोन फलंदाज फखर जमान आणि खुशदिल शाह हे डावखुरे फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत ऑफस्पिनर अश्विनला ( Spinner R Ashwin ) ठेवणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन आणि हसन अली.