ETV Bharat / bharat

Asaduddin Owaisi : मुस्लिमांना भारतात राहण्याची 'परवानगी' देणारे मोहन भागवत कोण? - असदुद्दीन ओवेसी - असदुद्दीन ओवेसी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मोहन भागवत यांची निवड कोणी केली? जर तुम्ही तुमच्याच देशात फूट पाडण्यात व्यस्त असाल तर तुम्ही जगाला वसुधैव कुटुंबकम म्हणू शकत नाही. (Asaduddin Owaisi on Mohan Bhagwat).

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Jan 11, 2023, 4:03 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांना भारतात राहण्याची किंवा आमचा धर्म पाळण्याची 'परवानगी' देणारे मोहन भागवत कोण आहेत? आम्ही भारतीय आहोत कारण अल्लाची तशी इच्छा होती. आमच्या नागरिकत्वावर 'अटी' लादण्याची त्यांची हिंमत कशी झाली? आमची श्रद्धा 'अ‍ॅडजस्ट' करण्यासाठी किंवा नागपुरातील तथाकथित ब्रह्मचारींच्या गटाला खूश करण्यासाठी नाही. (Asaduddin Owaisi on Mohan Bhagwat). राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनीही संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्तानने हिंदुस्थानच राहिला पाहिजे' या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत म्हटले की, मी याला सहमत आहे, पण 'माणूस हा माणूसच राहिला पाहिजे'.

  • Bhagwat :

    “ Hindusthan should should remain Hindusthan “

    Agree

    But:

    Insaan should remain Insaan

    — Kapil Sibal (@KapilSibal) January 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून भागवत यांची निवड कोणी केली? : ओवेसी पुढे म्हणाले की, 'मोहन भागवत म्हणतात की भारताला कोणताही बाह्य धोका नाही. संघाचे लोकं अनेक दशकांपासून 'अंतर्गत शत्रू' आणि 'युद्ध परिस्थिती'आहे अशी ओरड करत आहेत मात्र सरकारमधील त्यांचेच स्वयंसेवक म्हणतात, कोणीही घुसखोरी केली नाही. जर आपण खरोखरच युद्धजन्य परिस्थितीत आहोत तर 8 वर्षांपेक्षा जास्त काळ स्वयंसेवकांचे सरकार झोपले आहे का? कोणताही सुसंस्कृत समाज धर्माच्या नावाखाली असा द्वेष आणि कट्टरता सहन करू शकत नाही. हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून मोहन भागवत यांची निवड कोणी केली? ते जर 2024 मध्ये निवडणूक लढवणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र जर तुम्ही तुमच्याच देशात फूट पाडण्यात व्यस्त असाल तर तुम्ही जगाला वसुधैव कुटुंबकम म्हणू शकत नाही. ते म्हणाले की, पंतप्रधान इतर देशातील सर्व मुस्लिम नेत्यांना मिठी मारतात, पण त्यांच्याच देशात एकाही मुस्लिमाला मिठी मारताना दिसत नाही'.

भागवत यांचे तृतीयपंथीयांवरील विचार : संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायजर' आणि 'पांचजन्य'ला दिलेल्या मुलाखतीत (Mohan Bhagwat interview in Organiser) आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू धर्म ही आपली ओळख, राष्ट्रीयत्व आणि प्रत्येकाला आपले मानून इस्लामला देशात सोबत घेण्याची प्रवृत्ती असल्याचे म्हटले आहे. या मुलाखतींमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एलजीबीटी समुदायाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, त्यांच्या गोपनीयतेचा आदर केला गेला पाहिजे आणि संघ या विचाराला प्रोत्साहन देईल. अशा प्रवृत्तीचे लोक मानवी अस्तित्वापासून नेहमीच होते. हे जैविक आहे. हा जीवनाचा एक मार्ग आहे. त्यांना त्यांच्या गोपनीयतेचा अधिकार मिळावा आणि तेही या समाजाचाच एक भाग आहे, असे आम्हाला वाटते. ही एक साधी बाब आहे. ते म्हणाले की, तृतीय जातीचे लोक ही समस्या नाही. त्यांचा स्वतःचा पंथ आहे, त्यांच्या स्वतःच्या देवदेवता आहेत. आता त्यांच्याकडे महामंडलेश्वर आहे. ते म्हणाले की, संघाचा कोणताही वेगळा दृष्टिकोन नाही, आम्ही हिंदू परंपरेने या गोष्टींचा विचार केला आहे.

हिंदुस्थान हिंदुस्थानच राहिला पाहिजे : भागवत म्हणाले की, हिंदू हीच आपली ओळख, राष्ट्रीयत्व असून प्रत्येकाला आपले मानून सोबत घेण्याची प्रवृत्ती आहे. सरसंघचालक म्हणाले की, हिंदुस्थान हिंदुस्थानच राहिला पाहिजे, ही साधी बाब आहे. यामुळं आज भारतात असलेल्या मुस्लिमांचे काहीही नुकसान नाही. ते म्हणाले की इस्लामला कोणताही धोका नाही, परंतु आम्ही मोठे आहोत, आम्ही एकेकाळी राजे होतो, आम्ही पुन्हा राजे होऊ, असे विचार त्यांना काय कोणालाही सोडावे लागतील. असा विचार करणारा हिंदू असेल तर त्यालाही ही भावना सोडावी लागेल, असेही भागवत म्हणाले. तो जर कम्युनिस्ट आहे तर त्यालाही हे सोडावे लागेल.

लोकसंख्या उपयुक्त ठरू शकते : लोकसंख्या धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, सर्वप्रथम हिंदूंनी हे समजून घेतले पाहिजे की आज हिंदू बहुसंख्य आहेत आणि हिंदूंच्या उत्थानाने या देशातील सर्व लोक सुखी होतील. ते म्हणाले की, लोकसंख्या ज्याप्रमाणे ओझे आहे तसेच ती उपयुक्त देखील ठरू शकते. अशा स्थितीत मी आधी म्हटल्याप्रमाणे असे दूरगामी आणि सखोल विचार करून धोरण बनवले पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.