ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानबाबत कतारमध्ये पाकिस्तानसह तीन देशांची होणार बैठक, भारताला वगळले! - Zamir Kabulov on Afganistan situation

सतत युद्धजन्य स्थितीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानाची पुनर्रचना करताना भारताची महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. तरीही भारताला विस्तारित ट्रायकोच्या बैठकीत स्थान देण्यात आलेले नाही.

अफगाणिस्तानमध्ये संघर्ष
अफगाणिस्तानमध्ये संघर्ष
author img

By

Published : Aug 11, 2021, 3:42 PM IST

हैदराबाद - अफगाणिस्तानातील स्थितीवर विस्तारित ट्रायकोची कतारमध्ये बुधवारी बैठक होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे वर्चस्व वाढत असल्याने ही बैठक महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजनैतिक बैठक होत असताना भारत या बैठकीत सहभाग होणार नाही.

विस्तारित ट्रायकोच्या बैठकीत अमेरिका, चीन आणि पाकिस्तान सहभागी होणार आहे. ही बैठक रशियाने बोलाविली आहे. सतत युद्धजन्य स्थितीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानाची पुनर्रचना करताना भारताची महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. तरीही भारताला विस्तारित ट्रायकोच्या बैठकीत स्थान देण्यात आलेले नाही.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानसाठीच्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष राजदूत झामीर काबुलोव यांनी भारत हा विस्तारित गटात सहभागी होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. कारण, भारताचा तालिबानवर कोणताही प्रभाव नाही.

संबंधित बातमी वाचा-अफगाणिस्तान: रेडिओ स्टेशनच्या संपादकाची तालिबानी दहशतवाद्यांकडून हत्या, पत्रकारांना ठेवले ओलीस

भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी 5 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत विस्तारित ट्रायकोच्या बैठकीबाबत भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, की अफगाणिस्ताबाबत भारत नेहमीच रशियाच्या संपर्कात आहे. दोन्ही देशांमध्ये विशेष अशी रणनीतीची भागीदारी आहे.

संबंधित बातमी वाचा-"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

अफगाणिस्तानातील भारतीयांना तातडीने मायदेश आणा, सरकारचे कंपन्यांना निर्देश-

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत. याशिवाय मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात दिवसेंदिवस तालिबानचे वर्चस्व वाढत असून इथे संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.

संबंधित बातमी वाचा-अफगाणिस्तानातील भारतीयांना तातडीने मायदेशात आणा, सरकारचे कंपन्यांना निर्देश

अफगाणिस्तानातील स्थिती चिघळली

अमेरिकेने सैन्य माघारीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. तालिबानने आतापर्यंत अफगाणिस्तानातील पाच प्रांतांच्या राजधानीवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेचे सैन्य 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील संघर्ष सातत्याने वाढतच चालला आहे. गेल्या महिनाभरात इथे संघर्षात हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार शाखेच्या प्रमुखांनी नुकतेच म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.