नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’चे आवाहन केले आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्यांचा तुफान मारा केला. तसेच त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांवर याप्रकारे अत्याचार करणे, पूर्णपणे चुकीचे आहे. शांततापूर्ण प्रदर्शन त्यांचा संविधानिक अधिकार आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
-
केंद्र सरकार के तीनों खेती बिल किसान विरोधी हैं। ये बिल वापिस लेने की बजाय किसानों को शांतिपूर्ण प्रदर्शन करने से रोका जा रहा है, उन पर वॉटर कैनन चलाई जा रही हैं। किसानों पर ये जुर्म बिलकुल ग़लत है। शांतिपूर्ण प्रदर्शन उनका संवैधानिक अधिकार है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">केंद्र सरकार के तीनों खेती बिल किसान विरोधी हैं। ये बिल वापिस लेने की बजाय किसानों को शांतिपूर्ण प्रदर्शन करने से रोका जा रहा है, उन पर वॉटर कैनन चलाई जा रही हैं। किसानों पर ये जुर्म बिलकुल ग़लत है। शांतिपूर्ण प्रदर्शन उनका संवैधानिक अधिकार है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 26, 2020केंद्र सरकार के तीनों खेती बिल किसान विरोधी हैं। ये बिल वापिस लेने की बजाय किसानों को शांतिपूर्ण प्रदर्शन करने से रोका जा रहा है, उन पर वॉटर कैनन चलाई जा रही हैं। किसानों पर ये जुर्म बिलकुल ग़लत है। शांतिपूर्ण प्रदर्शन उनका संवैधानिक अधिकार है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 26, 2020
केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. हे कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांना शांतीपूर्ण प्रदर्शन करण्यापासून रोखण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्यांचा तुफान मारा केला असून अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. शेतकऱ्यांवर केलेला हा अत्याचार पूर्णपणे चुकीचा आहे. शांततापूर्ण आंदोलन त्यांचा संविधानिक अधिकार आहे, असे टि्वट केजरीवाल यांनी केले आहे.
पोलिसांकडून ड्रोनचाही वापर -
पंजाबमध्ये कृषी कायद्याविरोधातील आंदोलन उग्र झाले आहे. पंजाबच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरीकेड्स उचलून रस्त्यांच्या बाजूला फेकली आहेत. तसेच दिल्ली-जम्मू महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिसांना तैनात केले आहे. तसेच परिस्थितीवर नियत्रंण मिळवण्यासाठी पोलीस ड्रोनचाही वापर करत आहेत. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली पाहायला मिळाली.
हेही वाचा - मोदी सरकारविरोधात कामगार संघटनांचे देशव्यापी आंदोलन; पाहा LIVE अपडेट्स..