ETV Bharat / bharat

Punjab Assembly Elecions 2022 : कुमार विश्वास यांच्या आरोपांवर केजरीवाल गप्प का? राहुल गांधींचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बस्सी पठाणातील निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Rahul Gandhi on Arvind Kejriwal ) यांच्यावर गंभीर आरोप केले. 'काही दिवसांपूर्वी 'आप'चे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर राजकीय फायद्यासाठी अतिरेक्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला होता. त्याचा व्हिडिओ केवळ पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण देशात व्हायरल होत आहे. कुमार विश्वास यांनी 'आप' सुरू केली पण केजरीवालजींना त्यांच्या आरोपांवर एक शब्दही बोलता येत नाही. त्यांनी उत्तर दिले पाहिजे, असे राहुल म्हणाले.

Rahul Gandhi
राहुल गांधी
author img

By

Published : Feb 18, 2022, 9:51 AM IST

Updated : Feb 18, 2022, 11:14 AM IST

नवी दिल्ली - देशातील वातावरण निवडणुकामुळे चांगलेच तापलं आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच ( Assembly Elections in 5 States ) राज्यांच्या निवडणुका म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जणू सेमीफायनलच आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बस्सी पठाणातील निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( Rahul Gandhi on Arvind Kejriwal ) यांच्यावर गंभीर आरोप केले. 'काही दिवसांपूर्वी 'आप'चे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर राजकीय फायद्यासाठी अतिरेक्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला होता. त्याचा व्हिडिओ केवळ पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण देशात व्हायरल होत आहे. कुमार विश्वास यांनी 'आप' सुरू केली पण केजरीवालजींना त्यांच्या आरोपांवर एक शब्दही बोलता येत नाही. त्यांनी उत्तर दिले पाहिजे, असे राहुल म्हणाले.

'जो माणूस दहशतवाद्याच्या घरात झोपू शकतो, तो पंजाबचे रक्षण कसे करणार? घाबरणारा माणूस पंजाबचे रक्षण कसे करणार?, असे केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोगाने कुमार विश्वास यांचा व्हिडिओ प्ले करण्यावर बंदी घातली आहे. कुमार विश्वास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. ज्याचा एक भाग एएनआयने ट्विट केला होता आणि तो व्हायरल होत होता. त्यावर आम आदमी पक्षाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा व्हिडिओ टीव्ही, वेब/सोशल मीडियावर चालण्यास बंदी घातली होती. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या आदेशानुसार, हा व्हिडिओ प्ले करणे हे भारतीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. आज यावरील बंदी निवडणूक आयोगाने उठवली आहे.

कुमार विश्वास काय म्हणाले....

केजरीवाल यांचे नाव न घेता कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तान) पंतप्रधान होण्याची आकांक्षा असल्याचा आरोप केला होता. तसेच भारताचे तुकडे करणे आणि सत्ता मिळवण्यासाठी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करणे. या आरोपांची प्रत्येक मतदार आणि नागरिकाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. केजरीवाल हे सत्ता मिळवण्यासाठी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्यास तयार. गरज पडल्यास देश तोडण्याचीही त्यांची तयारी आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya Visiting Korlai Alibag : कोर्लईला भेट देऊन सत्य समोर आणणार - किरीट सोमैया

Last Updated : Feb 18, 2022, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.