ETV Bharat / bharat

Army Soldier Missing : सुट्टीवर आलेला सैनिक बेपत्ता, सुरक्षा दलाने शोधण्यासाठी सुरू केली मोहिम - सुरक्षा दल मोहिम जवान बेपत्ता

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून सैन्यदलाचा सैनिक बेपत्ता झाल्याची माहिती सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलेला नाही. सैन्यदलाच्या माहितीनुसार सैनिक जावेद अहमद वानी ही शनिवारी संध्याकाळी बेपत्ता झाले. ते कुलगाम जिल्ह्यातील अचथल भागातील रहिवाशी आहेत.

Army Soldier Missing
सुट्टीवर आलेला सैनिक बेपत्ता
author img

By

Published : Jul 30, 2023, 12:41 PM IST

Updated : Jul 30, 2023, 1:15 PM IST

बेपत्ता सैनिकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू

श्रीनगर: सैन्यदलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम आखली असताना चिंतेची बातमी समोर आली आहे. सुट्टीवर गावी आलेला सैनिक बैपता झाला आहे. जावेद अहमद असे या सैनिकाचे नाव आहे. सैनिक बेपत्ता झाल्याची माहिती सैन्यदलाने सैनिकाच्या कुटुंबियांना दिली आहे. सैनिकाला शोधण्यासाठी सैन्यदलाने शोध मोहिम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये सैन्यदलात तैनात असलेले वानी हे रजेवर होते. त्यांची कार कुलगाम जिल्ह्यातील परनहॉल गावात सापडली आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सैनिक बेपत्ता झालेल्या घटनेला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही, मात्र सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेपत्ता झालेल्या सैनिकाचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू केला आहे. मुलाला लवकरात लवकर शोधावे, असे आवाहन वानीच्या पालकांनी केले आहे.

काही चूक केली असेल तर त्याला माफ करा- सोशल मीडियावर वानींच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वानींची आई म्हणते, की वानी आपल्या कारमधून बाजारातून किराणा सामान घेण्यासाठी गेला. मात्र, तो परत आला नाही. बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. देखभालीसाठी जावेद अहमद वानी हा एकमेव आधार आहे. सुरक्षा दल आणि पोलिसांनी आपल्या मुलाला लवकरात लवकर शोधावे, असेही सैनिकाच्या आईने आवाहन केले आहे. मुलाने काही चूक केली असेल तर त्याला माफ करा, अशी कळकळीची विनंतीदेखील सैनिकाच्या आईने केली आहे.

दहशतवाद्याला अटक केल्याचा पोलिसांचा दावा- श्रीनगर येथून अल-बदर संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केल्याचा पोलिसांनी शनिवारी दावा केला. हा दशतवादी अर्गट अल बार्डशी संबंधित आहे. त्याच्या ताब्यातून एक ग्लॉक पिस्तूल, 20 जिवंत काडतुसे आणि जहाल मजकूर असलेली दोन मासिके जप्त करण्यात आली आहेत. हा दहशतवादी पुलवामा आणि श्रीनगरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आर्म्स ऍक्ट नुसार बाटमालोन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

हेही वाचा-

Last Updated : Jul 30, 2023, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.