श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मागावाह भागात नेहमीप्रमाणे सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, हेलिकॉप्टर अचानक कोसळले. ही दुर्घटना काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मागावाह भागात गुरुवारी सकाळी घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी दहाच्या सुमारास मच्छना धारिन्हाजवळ घडली. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाने मोठी बचाव मोहीम सुरू केली आहे. सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याने घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.
तेव्हा सैन्यदलाच्या एचएएलने बनवलेले ध्रुव हेलिकॉप्टर मडगावहून किश्तोवगडच्या दिशेने जात होते. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये तीन जवान होते. या घटनेत दोन जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर एक जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात मगवाह भागातील डोंगराळ भागात झाला.
लँडिंग होताना अपघात झाल्याचा अंदाज- सैन्यदलाच्या माहितीनुसार सकाळी 11.15 च्या सुमारास, ऑपरेशनल मिशनवर असलेल्या आर्मी एव्हिएशन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कोसळण्याच्या स्थिती होते. हे हेलिकॉप्टर पायलटने जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात मरुआ नदीच्या काठावर सावधगिरीने लँडिंग केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) तांत्रिक बिघाडाची माहिती दिली होती. त्यानंतर सावधगिरीने लँडिंगसाठी पुढे हेलिकॉप्टर नेण्यात आले. खडबडीत भूभाग आणि लँडिंग क्षेत्राची पूर्वतयारी नसल्यामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग करणे जिकिरीचे होते. त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केरळमध्येही कोसळले होते हेलिकॉप्टर- भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर 26 मार्च रोजी केरळमधील कोची येथे कोसळले होते. ते नेदुम्बसेरी विमानतळावरील धावपट्टीजवळ कोसळले होते. नेदुम्बसेरी विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच हेलिकॉप्टर कोसळले. त्यावेळीदेखील हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. या घटनेत तटरक्षक दलाचे अधिकारी सुनील लोटला जखमी झाले. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, हा अपघात दुपारी 12.25 वाजता झाला. अपघातानंतर विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. ओमानहून येणारे विमान तिरुअनंतपुरम विमानतळाकडे वळवण्यात आले होते.