ETV Bharat / bharat

भारतीय लष्कर प्रमुखांना नेपाळी लष्करातील 'मानद जनरल श्रेणी' बहाल - लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे लेटेस्ट न्यूज

भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे बुधवारपासून तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी एम.एम. नरवणे यांना नेपाळी लष्करातील मानद जनरल श्रेणी बहाल केली.

नेपाळ
नेपाळ
author img

By

Published : Nov 5, 2020, 3:43 PM IST

Updated : Nov 5, 2020, 5:13 PM IST

काठमांडू - नेपाळ-भारत सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. या परिस्थितीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी एम.एम. नरवणे यांना नेपाळी लष्करातील मानद जनरल श्रेणी बहाल केली. ही परंपरा 1950मध्ये सुरू झाली होती.

  • Nepal: Army Chief General Manoj Mukund Naravane conferred with the honorary rank of ‘General of the Nepal Army’ by Nepal President Bidhya Devi Bhandari pic.twitter.com/h0oaX2UVhj

    — ANI (@ANI) November 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जनरल एम. एम. नरवणे हे बुधवारी नेपाळमध्ये पोहचले असून त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. दोन्ही देशामध्ये शांतता प्रस्थापीत करणे, हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. एम. एम. नरवणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वीणा नरवणेही आहेत. नेपाळने जारी केलेल्या वादग्रस्त नकाशानंतर भारताच्या उच्च नेत्याचा नेपाळचा दौरा करण्याची ही पहिली वेळ आहे. नेपाळचे लष्कर प्रमुख पूर्ण चंद्र थापा आणि भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या दरम्यान चर्चेतून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर आणि मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

भारत-नेपाळ वाद -

भारत नेपाळमध्ये सीमावाद सुरु झाला असताना नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. तसेच नेपाळने भारतीय हद्दीतील लिपूलेक, लिंपियाधूरा आणि कालापाणी हे रणनितीकदृष्या महत्त्वाच्या भूप्रदेशावर आपला दावा सांगितला. हे भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट करण्यासाठी घटनादुरुस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबध बिघडले आहेत. कृत्रिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा प्रयत्न भारत कधीही मान्य करणार नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. कैलास मानसरोवरला जाणाऱ्या रस्त्यावरही नुकतेच नेपाळने दावा केला आहे. या 80 किमी रस्त्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उद्घाटन केले होते.

Last Updated : Nov 5, 2020, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.