ETV Bharat / bharat

उदास आहात? मूड चांगला ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय - maintain a good mood

serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते. आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळते. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.

are you depressed
उदास आहात ?
author img

By

Published : Oct 22, 2022, 5:47 PM IST

आयुष्यात असे अनेक वेळा येतात जेव्हा तुमचा मूड काही कारणास्तव किंवा विनाकारण बिघडतो. खराब मूड अपघात, तणाव किंवा नकारात्मक विचारांमुळे होऊ शकतो. वाईट मूडमुळे तुम्ही कुटुंब आणि मित्रांपासूनही दूर राहता.

मूड चांगला राहण्यासाठीचे उपाय : ज्या क्षणी तुम्हाला मन उदास झाल्याची जाणीव होईल तेंव्हा दीर्घ श्वासोच्छवास करण्याची सवय लावून घ्या. दीर्घ श्वासोच्छवास करणे हा मेडिटेशनचाच एक भाग असतो. यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यास मदत होते. अनियमित झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की, झोपेचा आणि serotoninचा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या. हळद मध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.

मसाज घेतल्याने खूप मोकळे वाटते. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotoninच्या वाढीस चालना मिळते. त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटते असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotoninची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.काळामिरीमध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते. व्यायाम serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम (Exercise) करा आणि प्रसन्न रहा.

दररोज सकस आहार घ्या. तुम्हाला तुमचा मूड बरोबर ठेवायचा असेल, तर लक्षात ठेवा की तुमचे दिवसातील तीन जेवण हेल्दी असले पाहिजे. मूड योग्य ठेवण्यासाठी, जर तुम्ही नाश्त्यापासून सुरुवात केली तर हिरव्या भाज्या आणि प्रथिने जसे की अंडी, बदाम इत्यादी खा. नाश्ता कधीही वगळू नका. तसेच दिवसभर दही, फळे आणि ड्रायफ्रुट्स असे काही तरी हलके खात राहा. पुरेसे पाणी न पिल्याने तुम्हाला आळशी वाटू लागते, ज्यामुळे तुमचा मूडही चांगला राहत नाही. मूड चांगला नसताना एक ग्लास पाणी नीट प्यायले तर शरीर आणि मन फ्रेश वाटू लागते. लक्षात ठेवा की हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही सोडा किंवा इतर काही पेये पिऊ नयेत आणि फक्त पाणी प्यावे, तेही दिवसभरात सात ते आठ ग्लास.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.