ETV Bharat / bharat

Hyderabad Terror Conspiracy Case : हैदराबाद दहशतवादी कट प्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक - bomb blasts in Hyderabad during Dussehra

हैदराबाद पोलिसांनी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही जणांचा शोध अद्याप सुरू आहे.

Hyderabad Terror Conspiracy Case
हैदराबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By

Published : Feb 17, 2023, 2:40 PM IST

हैदराबाद : गेल्या वर्षी दसरा उत्सवादरम्यान हैदराबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून दहशतवादी कट रचल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हेदराबादच्या जुन्या शहरातील मोहम्मद अब्दुल कलीम उर्फ अर्शद खान (३९) याला सीआयटी आणि सीसीएस पोलिसांनी अटक करून गुरुवारी चंचलगुडा कारागृहात हलवले आहे.

बॉम्बस्फोटाच्या तयारीत होते : कलीमने पाकिस्तानातून हवालाची रक्कम अब्दुल जाहेद उर्फ मोटू (३९), मोहम्मद समीउद्दीन उर्फ सामी (३९) आणि माझ हसन फारुक उर्फ माझ (२९) या दहशतवाद्यांना दिली होती. हे तिघे बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्याने एकूण 40 लाख रुपये घेऊन जाहेदला दिले. त्यापैकी 15 लाख रुपयांना दोन दुचाकी खरेदी केल्या. पोलिसांनी 20,41,800 रुपये जप्त केले आहेत.

गेल्या वर्षी झाली होती अटक : काही दिवसांपासून कलीमच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या एसआयटी आणि सीसीएस पोलिसांनी नुकतीच त्याला अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. या तिन्ही आरोपींना गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून चार चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत तपासादरम्यान अधिक माहिती मिळाली.

संभाषण गोळा केले : मुख्य आरोपी अब्दुल जाहेद याला 2005 च्या टास्कफोर्स ऑफिस बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र 2 ऑगस्ट 2017 रोजी त्याची सुटका करण्यात आली होती. या घटनेतून बोध न घेता त्याने पुन्हा एकदा कट रचला. त्याने पाकिस्तानमधील काही एन्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप्ससोबत चॅट केले. कटाचा एक भाग म्हणून, कलीमने पाकिस्तानमधून हवालाचे पैसे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. मेळावे आणि उत्सवात ग्रेनेड फेकण्याची त्यांची योजना होती. तपास करणार्‍या पोलिसांनी जाहेद आणि माजीद यांच्यातील मोबाईल संभाषण गोळा केले आहे.

बॉम्बस्फोट प्रकरणी छापेमारी : कोईम्बतूर शहरातील कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर 23 ऑक्टोंबरला कारमध्ये सिलेंडरचा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मृतक तरुण जमेशा हा आयएसआयएस या संघटनेशी संबंधित असल्याचे एनआयएच्या तपासातील कागदपत्रावरुन उघड झाले होते. या प्रकरणी एनआयएने कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये 60 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

हेही वाचा : Coimbatore blast case : कोईम्बतूर कार सिलेंडर बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची तीन राज्यात छापेमारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.