ETV Bharat / bharat

Delhi Crime : दिल्लीत श्रद्धा खून प्रकरणाची पुनरावृत्ती; लग्नास विरोध करणाऱ्या प्रेयसीचा खून करुन नराधमाने मृतदेह ठेवला फ्रिजमध्ये - ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवला तरुणीचा मृतदेह

दिल्लीत श्रद्धा खून प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. श्रद्धा खून प्रकरणासारखीच घटना पुन्हा दिल्लीत घडल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे. लग्नास विरोध केल्याने साहिल गहलोत या तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी साहिल गहलोत याला अटक केली आहे.

Accused Killed Girlfriend
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 14, 2023, 6:47 PM IST

नवी दिल्ली : लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याने खळबळ उडाली. ही घटना दिल्लीतील हरिदास नगर परिसरातील घडली असून एका ढाब्यातील फ्रिजमधून तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. साहिल गहलोत असे खून करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. साहिल हा मितराऊ गावातील राहणारा आहे. श्रद्धा खून प्रकरणासारखेच हे प्रकरण असल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे.

लग्नासाठी तरुणी टाकत होती दबाव : दिल्लीतील एका तरुणीचे साहिल गहलोत याच्याशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याने तरुणी साहिलवर लग्नासाठी दबाव टाकत होती. मात्र साहिल तिच्यासोबत लग्न करण्यास उत्सुक नसल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. यातूनच साहिलने त्या तरुणीचा मितराऊ गावाच्या परिसरात खून केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंह यांनी दिली.

ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवला तरुणीचा मृतदेह : साहिलवर लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या तरुणीचा साहिलने मितराऊ गावाच्या परिसरात खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मितराऊ गावाच्या परिसरात असलेल्या ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवून ठेवला. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने याबाबतची माहिती मिळताच प्रियकर साहिल गहलोतच्या मुसक्या आवलून त्याला अटक केली. पोलिसांनी ढाब्यातील फ्रिजमधून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्याची माहितीही अतिरिक्त पोलीस उपायुक्त विक्रम सिंह यांनी दिली.

लग्नाच्या दिवशीच केला प्रेयसीचा खून : दिल्लीतील उत्तमनगर परिसरातील तरुणीचे साहिल गहलोत यांच्याशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणीला साहिलसोबत लग्न करायचे होते. मात्र साहिलचे लग्न ठरले होते. 10 फेब्रुवारीला साहिलचे लग्न होणार होते. त्याच दिवशी त्याचा त्याच्या प्रेयसीसोबत वाद झाला. तिने साहिलला ल्गन करण्यास विरोध केला. त्यामुळे साहिलने प्रेयसीचा खून करुन तिचा मृतदेह मितराऊ गावातील परिसरात असलेल्या ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवून ठेवला.

तरुणी बेपत्ता झाल्याची माहितीच नाही : साहिल गहलोतने त्याच्या प्रेयसीचा 10 फेब्रुवारीलाच खून केल्याची माहिती दिल्लीच्या गुन्हे शाखेच्या पथकाला दिली. मात्र त्याची प्रेयसी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली नाही. याबाबतची माहितीही तिच्या घरच्यांना नसल्याचे उघड केले. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला खून होऊनही स्थानिक पोलिसांना याबाबतची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरुन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना या खुनाबाबतची माहिती दिली. त्यानंतर घटना उघडकीस आली.

श्रद्धा खून प्रकरणाशी साधर्म्य : पालघर येथील श्रद्धाचा खून आफताबने दिल्लीत केला होता. खून करुन त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने देशभर खळबळ उडाली होती. त्याचप्रकारे हा खून झाल्याने आता दिल्ली पुन्हा हादरली आहे.

हेही वाचा - Valentines Day Crime In Nanded: 'व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो'; महाविद्यालयीन तरुणावर पॉस्कोचा गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.