ETV Bharat / bharat

Amritsar Blast : अमृतसर हादरले, गोल्डन टेम्पल परिसरात झाला दुसरा स्फोट; वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल - ऐतिहासिक मंदिर

अमृतसरच्या गोल्डन टेम्पल परिसरात शनिवारी रात्री स्फोट झाला होता. या स्फोटात 5 ते 6 नागरिक जखमी झाले होते. याच ठिकाणी आज सकाळी दुसरा स्फोट झाला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Amritsar Blast
घटनास्थळावर दाखल झालेले पोलीस
author img

By

Published : May 8, 2023, 12:07 PM IST

अमृतसर : गोल्डन टेम्पल परिसरात पुन्हा एकदा स्फोट झाल्याने नागरिक हादरले आहेत. आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान हा स्फोट झाल्याने गोल्डन टेम्पल परिसरातील भाविकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग हे घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शनिवारी याच ठिकाणी स्फोट झाल्यानंतर आजही त्याच ठिकाणी स्फोट झाल्याने भाविकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.

एकाच ठिकाणी दोन स्फोट : अमृतसरमधील ऐतिहासिक मंदिर परिसरात शनिवारी रात्री स्फोट झाल्याने नागरिक हादरले होते. त्याला काही तास उलटले आहेत. मात्र त्याच ठिकाणी आज सकाळी दुसरा स्फोट झाल्याने भाविकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त गुरिंदरपाल सिंग नागराही उपस्थित आहेत. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी या परिसरात पाहणी केली. यावेळी पोलीस अधिकारी मेहताब सिंग यांनी आम्ही संपूर्ण घटनेची चौकशी करत आहोत. या घटनेमधील माहिती लवकरच बाहेर येईल, त्याबाबत नागरिकांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेटल केसमध्ये ठेवले होते स्फोटक साहित्य : शनिवारी झालेल्या स्फोटात पदार्थ मेटल केसमध्ये हे स्फोटक पदार्थ ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले. चिमणीत पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून आयईडीमुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

शनिवारी झाला होता स्फोट : शनिवारी याच परिसरात झालेल्या स्फोटात ५ ते ६ नागरिक जखमी झाले होते. आतापर्यंत या स्फोटाचे कारण शोधण्यात पोलिसांना यश आले नसून यादरम्यान आणखी एक स्फोट झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी शनिवारी रात्री बाराच्या सुमारास हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला होता. या स्फोटामुळे सारागढी पार्किंगमधील खिडक्यांच्या काचा फुटल्याने ५ ते ६ यात्रेकरू जखमी झाले. पोलीस उपायुक्त परमिंदर सिंह भंडाल यांनी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळावरून सुमारे 3-4 संशयास्पद तुकडे सापडले असून ते तपासण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा -

Mafia Atiq Ahmed Son Custody : उमेश पाल हत्याकांड प्रकरणी अतिक अहमदच्या मुलाची पोलीस मागणार कोठडी

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, 10 मे रोजी होणार मतदान

West Bengal News : इस्कॉनच्या पुजाऱ्याचा सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल झाल्याने महाराज फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.