ETV Bharat / bharat

Man Chops Off His Private Part In Bihar पत्नी माहेरात गेल्याने संतापलेल्या पतीने आपले गुप्तांग कापून वाहिले कुलदेवतेला, बिहारमध्ये खळबळ - गुप्तांग कापून ठेवले कुलदेवतेसमोर

पत्नी माहेरात गेल्यामुळे संतापलेल्या पतीने आपले गुप्तांग कापून ते कुलदेवतेला वाहिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील मधेपुरा परिसरातील मुरलीगंजमध्ये घडली. कृष्णा वासुकी असे त्या गुप्तांग कापून घेतलेल्या पतीचे नाव आहे. त्याला पाटण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Man Chops Off His Private Part In Bihar
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 21, 2023, 4:32 PM IST

मधेपुरा - पत्नी माहेरी गेल्याने पतीला राग अनावर झाला. त्यात या तरुण पतीने गवत कापण्याच्या धारदार चाकूने आपले गुप्तांग कापल्याने खळबळ उडाली. गुप्तांग कापल्याने तो वेदनेने व्हिवळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना दिसला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मुरलीगंजच्या रजनीनगर वार्ड क्रमांक 17 मध्ये घडली. कृष्णा वासुकी असे पीडित तरुणाचे नाव आहे. सध्या कृष्णाला पाटणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गुप्तांग कापून ठेवले कुलदेवतेसमोर : कृष्णाची पत्नी त्याला न सांगता तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे कृष्णा संतप्त झाला होता. पत्नीच्या विरहात त्याला काही सुचेना झाले. त्यामुळे त्याने आपले गुप्तांग गवत कापण्याच्या धारदार चाकूने कापले. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने ते कापलेले गुप्तांग कुलदेवतेसमोर ठेवले. मात्र त्याला जोरात वेदना होऊ लागल्याने तो वेदनेने विव्हळत होता. त्याचा रडण्याचा आवाज आल्याने नातेवाईक त्याच्याकडे आले. त्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. नातेवाईकांनी गावात त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला जननायक कर्पुरी मेडिकल महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनीही त्याला पुढील उपचारासाठी पाटण्याला हलवले आहे.

भाजी मंडईत करायचा काम : बिहारचा कृष्णा हा भाजी मंडईत काम करण्यासाठी पंजाबला गेला होता. तिथेच तो भाजी मंडईत काम करत होता. मात्र गेल्या दोन महिन्यापूर्वी तो पुन्हा आपल्या गावात परत आला होता. मात्र परत आल्यावर त्याची पत्नी अनिता देवी ही त्याला न सांगता तिच्या माहेरात गेली होती. याबाबतची माहिती त्याला त्याच्या नातेवाईकांनी दिली. त्यामुळे कृष्णा चांगलाच संतापला. त्याने रात्री जेवण करुन चारा कापण्याच्या धारदार शस्त्राने आपले गुप्तांग कापले. ते कापलेले गुप्तांग कुलदेवतेला वाहिले. त्यानंतर मात्र त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. वेदनेमुळे तो जोरजोरात विव्हळत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याकडे धाव घेतली.

तीन मुली एक मुलगा घेऊन पत्नी गेली माहेरात : त्याची पत्नी त्याला न विचारताच आपल्या तीन मुली आणि एका मुलाला घेऊन माहेरात गेली होती. कृष्णा घरी आल्यानंतर त्याने याबाबत आपल्या नातेवाईकांना विचारले. त्यावेळी त्यांनी त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरात गेल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कृष्णाचा संताप अनावर झाला. त्याच रागाच्या भरात त्याने आपले गुप्तांग कापून कुलदेवतेला वाहिल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा - जंगलात नग्न अवस्थेत सापडले तरुण-तरुणीचे मृतदेह.. तरुणाचे गुप्तांगही कापले.. हत्या केल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.