विजयवाडा : एनटीआर जिल्ह्यातील नंदीगामा शहरात गुरुवारी एका १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या ( Suicide Of Teenager ) केली. कर्ज वसुली करणारे बँकेचे एजंट त्यांच्या घरी आले होते आणि कर्ज फेडण्यासाठी तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर तिने एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की तिच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जस्टी हरिता वर्षानी ही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. EAPCET परीक्षेतही तिला चांगली रँक मिळवली.
तिचे वडील प्रभाकर राव यांनी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड वापरून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते. रक्कम परत न केल्याने कर्जवसुली करणाऱ्या बँकेच्या एजंटांनी त्यांच्या घरी जाऊन शेजाऱ्यांच्या समोर वडिलांचा अपमान केला. वडिलांच्या अपमानाला कंटाळून मुलीने गुरुवारी पहाटे पंख्याला गळफास लावून घेतला. तिने गळफास घेतला त्यावेळी घरातील सर्वजण झोपलेले होते.