ETV Bharat / bharat

Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला मोहालीचा 'लाल', धाय मोकलून रडत आहे कुटुंब - कर्नल मनप्रित सिंग यांचं पार्थिव

Anantnag Encounter : मायभूमीचं रक्षण करताना पंचकुला येथील कर्नल मनप्रित सिंग यांना अनंतनाग जिल्ह्यात सुरू असलेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आलं आहे. त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली असून दुपारपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या मोहालीत गावी पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Anantnag Encounter
कर्नल मनप्रित सिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 12:23 PM IST

Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला मोहालीचा 'लाल'

चंदीगड Anantnag Encounter : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील तीन अधिकाऱ्यांना वीरमरण ( Encounter In Jammu Kashmir ) आलं आहे. या चकमकीत मोहालीचे कर्नल मनप्रित सिंग यांनाही वीरमरण आल्यानं मोहालीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कर्नल मनप्रित सिंग यांना वीरमरण आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली असून दुपारपर्यंत त्यांचं पार्थिव मोहालीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नल मनप्रित सिंग यांच्या मोहालीतील भांजोरिया या गावात शोककळा पसरली आहे. तर त्यांचे कुटुंबीय धाय मोकलून आक्रोश करत आहेत.

पत्नी आणि मुलींना दिली जखमी झाल्याची माहिती : अनंतनाग जिल्ह्यात वीरमरण आलेल्या कर्नल मनप्रित सिंग यांना दोन मुली असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मात्र कर्नल मनप्रित सिंग यांच्या पत्नी आणि मुलींना ते हुतात्मा झाल्याची माहिती देण्यात आली नाही. मनप्रित सिंग हे चकमकीत जखमी झाल्याचं त्यांच्या मुली आणि पत्नीला सांगण्यात आलं आहे. मनप्रित सिंग वीरगतीस प्राप्त झाल्यानं त्यांच्या पंचकुला सेक्टर 26 येथील निवासस्थानी आणि मोहाली इथल्या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. मनप्रित सिंग यांच्या घरी फक्त त्यांची बहीण आणि भावाची पत्नीच असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.

तीन पिढ्यांपासून करतात देशसेवा : अनंतनाग चकमकीत वीरमरण आलेल्या मनप्रित सिंग यांच्या कुटुंबाला देशसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांच्या तीन पिढ्या देशसेवेत कार्यरत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मनप्रित सिंग यांचे आजोबा शीतल सिंग, वडील दिवंगत लखमीर सिंग आणि काका रणजित सिंग हे देखील सैन्यात होते. त्यांचे वडील लखमीर सिंग हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पंजाब विद्यापीठात सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.

राष्ट्रीय रायफल्समध्ये करणार होते कार्यकाळ पूर्ण : अनंतनाग जिल्ह्यातील चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग यांना बुधवारी वीरमरण आलं आहे. कर्नल मनप्रीत सिंग भारतीय सैन्य दलात 19 राष्ट्रीय रायफल्स (RR) बटालियनमध्ये सेवा बजावत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात यशस्वी कामगिरी केली आहे. मात्र बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना आपलं सर्वोच्च बलिदान द्यावं लागलं. कर्नल मनप्रीत सिंग चार महिन्यांनंतर राष्ट्रीय रायफल्समधील आपला कार्यकाळ पूर्ण करणार होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र त्यापूर्वीच कर्नल मनप्रित सिंग यांना वीरमरण आलं.

हेही वाचा :

  1. Anantnag Encounter : जिथं बजावलं पहिलं कर्तव्य तिथंच घेतला अखेरचा श्वास, पानिपतच्या मेजर आशिष धोनकची शौर्यगाथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.