पानीपत Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले पानिपतचे मेजर आशिष धौंचक यांचे पार्थिव दुपारी पानिपतला पोहोचण्याची शक्यता आहे. आशिष यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बिंझौल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या आशिषचे कुटुंब पानिपतमध्ये भाड्याच्या घरात राहतात. पुढच्या महिन्यात आशिष यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा होता. (ashish dhonchak martyred in anantnag encounter)
महिनाभरापूर्वीच सर्व सुख हिरावून घेतले : हुतात्मा आशिष 13 ऑक्टोबरला रजेवर आपल्या नवीन घरात दाखल होणार होते. याच घरात 22 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन होता. पण, या घटनेनं त्यांच्या परिवाराकडून सर्व आनंद हिरावून घेतलाय. आशिष यांची 'गृह प्रवेश' ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आशिषचे पार्थिव प्रथम सेक्टर-७ मधील टीडीआय सिटी येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थीव मूळ गावी बिंझौल येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पानिपतच्या लालचंदचे लाल शहीद : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पानिपतच्या लालचंदचे लाल, मेजर आशिष धौंचक हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. आशिषच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येत आहेत. त्याचवेळी मुलाच्या हौतात्म्याची बातमी ऐकून वडील लालचंद यांची प्रकृती बिघडली आहे.
आशिषचे पार्थिव आज पानिपतला पोहोचणार : मिळालेल्या माहितीनुसार, आशिष यांचे पार्थिव प्रथम राजौरीहून विमानाने दिल्लीत आणले जाईल. त्यानंतर दिल्लीहून सैन्याच्या ॲम्ब्युलन्सने पानिपतला आणलं जाईल. तिथे लोक त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहणार आहेत.
हेही वाचा :